news
clock

जनहित चॅरिटेबल ट्रस्टची 'सामुदायिक मंगल परिणय सोहळा नियोजन समिती जाहीर 

पिंपरी, ता. ६ - मावळ तालुक्यातील जनहित चॅरिटेबल ट्रस्टची 'सामुदायिक मंगल परिणय सोहळा - २०२६'ची नियोजन समिती नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी प्रवीण भवार आणि  महासचिवपदी प्रतीक देसाई यांची निवड करण्यात आली.

जनहित चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने २०१९ पासून दरवर्षी सामुदायिक मंगल परिणय सोहळा घेण्यात येतो. राज्यात सामुदायिक बौद्ध सोहळे आयोजित करणारे हे एकमेव ट्रस्ट म्हणून ओळखले जाते. या वर्षी हा सोहळा १२ मे रोजी होणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अजय भवार, सचिव सचिन कांबळे, विश्वस्त प्रभाकर वाघमारे, संजय गायकवाड, आनंद वंजारी, अनिल गायकवाड, नीलेश शिंदे, दलितानंद थोरात, ज्योती शिंदे, संदीप ओव्हाळ, सचिन भवार, दादासाहेब यादव आदी उपस्थित होते.

''विवाहेच्छुक उपासक-उपासिकांनी या नियोजित सामुदायिक मंगल परिणय सोहळ्यात सहभागी व्हावे. जेणेकरुन कुटुंबाचा आर्थिकभार हलका होईल.'', असे आवाहन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अजय भवार यांनी केले आहे. प्रास्ताविक सचिन कांबळे यांनी केले. विश्वस्त प्रभाकर वाघमारे यांनी आभार मानले.

नियोजन समितीचे पदाधिकारी - अध्यक्ष प्रवीण भवार, कार्यक्रम प्रमुख- प्रकाश गायकवाड, उपाध्यक्ष - प्रवीण साळवे, महासचिव - प्रतीक देसाई, सहसचिव प्रवीण सरोदे, कार्याध्यक्ष रवी भवार, सहकार्याध्यक्ष- संदीप जाधव, कोषाध्यक्ष-नीलेश गायकवाड, सहकोषाध्यक्ष- मनिषा ओव्हाळ, संपर्क प्रमुख भाऊ साबळे, राहुल जाधव, याशिवाय विभागीय अध्यक्ष, शहराध्यक्ष, प्रसिद्धी प्रमुख, संघटक आदींची नियुक्ती करण्यात आली.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories