news
clock
मावळ तालुक्यात शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शिक्षक संघटनेची अधिकाऱ्यांशी चर्चा

मावळ तालुक्यात शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शिक्षक संघटनेची अधिकाऱ्यांशी चर्चा

 मावळ तालुक्यात शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शिक्षक संघटनेची अधिकाऱ्यांशी चर्चा

पिंपरी, ता. २५ - शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत  मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान व गट शिक्षणाधिकारी शिल्पा रोडगे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

शिक्षकांच्या मागण्यांमध्ये, गेली तीन वर्षे तालुक्याचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आलेले नाहीत ते जाहीर करावेत, शाळांमध्ये ग्रामपंचायतीमार्फत बसवलेल्या सीसीटीव्हींचे नियंत्रण (अॅक्सेस) संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडे असावे, प्रलंबित असलेली बिले अदा करावीत, शिक्षकांच्या अर्जित रजा अथवा वैद्यकीय रजा मंजुरीबाबत विलंब होऊ नये, काही शिक्षकांचा वर्षभरात कपात झालेला अॅडव्हान्स टॅक्स  परत मिळावा, शाळा व ग्रामपंचायत यांचे ध्वजस्तंभ स्वतंत्र असावेत, या मागण्यांचा समावेश आहे.

गटविकास अधिकारी प्रधान व गट शिक्षणाधिकारी रोडगे यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला व त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. सहाय्यक गट विकास अधिकारी सेवक थोरात, राज्य संघाचे सल्लागार राजू भेगडे, सुमती निलवे, पुष्पा घोडके, राजेश राऊत, हरिश्चंद्र शिवदे, अमोल चव्हाण, तालुकाध्यक्ष मुकुंद तनपुरे, महिला अध्यक्षा मनिषा गाडे, संतोष भारती, कल्याणी गायकवाड, सचिन आंब्रुळे, नवनाथ आडकर यावेळी उपस्थित होते.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories