शहरवासियांसाठी महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे २२ जुलैला उद्घाटन

शहरवासियांसाठी महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे २२ जुलैला उद्घाटन

 शहरवासियांसाठी महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे २२ जुलैला उद्घाटन 

पिंपरी, ता. १८ जुलै २०२६ -  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडकरांसाठी एक महत्त्वपूर्ण लोकहिताचा उपक्रम साकारत आहे. दिनांक २२ जुलै २०२६ रोजी ‘महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्षा’चे उद्घाटन होणार आहे.

या कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना महापौर निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आणि आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपचारांसाठी आवश्यक आर्थिक सहाय्य व मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. या कक्षाद्वारे गरजू रुग्णांना महापौर निधीतून 5,000 रुपयांपर्यंतचे तात्काळ सहाय्य, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून तब्बल 1.5 ते 2 लाख रुपयांपर्यंतची केली जाणार आहे.

महापौर यांनी या कक्षाची प्रत्यक्ष पाहणी करून सर्व तयारीचा आढावा घेतला. प्रत्येक गरजू नागरिकाला वेळेत उपचार आणि योग्य मदत मिळावी, हाच या उपक्रमामागील संकल्प आहे, अशी माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories