पिंपरी-चिंचवड पोलिसांची जानेवारी ते मार्च २०२६ पर्यंत ७९ गुन्हेगारांवर 'मोका अंतर्गत कारवाई'
पिंपरी, ता. ६ - शहरातील संघटित गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरातील एकूण १५ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील जानेवारी ते मार्च २०२६ मध्ये १६ गुन्हयांतील एकूण ७९ गुन्हेगारांवर मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी शहरातील सराईत गुन्हेगारांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचा नायनाट करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले होते. त्यानुसार, सन २०२५ मध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील ४५ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकुण २२८ आरोपींवर मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
जानेवारी ते मार्च २०२६ मध्ये कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगारांनी संघटनेचा प्रमुख म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकटयाने किंवा संयुक्तपणे, हिंसाचाराचा वापर करुन अथवा हिंसाचाराची धमकी देवून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे शहर पोलीस आयुक्तालय, सातारा, नांदेड, लातुर हद्दीत गंभीर गुन्हे केले. या गुन्ह्यांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणे, दरोडा, अंमली पदार्थ जवळ बाळगणे, जबरी चोरी, चोरी, वाहन चोरी, घरफोडी, गंभीर दुखापत, खंडणी मागणे, अपहरण करणे, गैर कायदयाची मंडळी जमविणे, धाकदपटशा, दरोडयाची तयारी करणे, अडवून दरोडा टाकणे, मनाई आदेशाचा भंग करणे, मोबाईल हिसकावणे, तोडफोड करणे, अग्निशस्त्रे व जिवघेणी हत्यार जवळ बाळगणे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणे अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.
गुन्हेगारांची नावे पुढीलप्रमाणे -
१) काळेवाडी पोलिस ठाणे - आरोपी १) विशाल ऊर्फ मन्या भिमराव कांबळे, वय २१ वर्षे, रा. श्रीनगर, काळेवाडी, पुणे. (टोळी प्रमुख) २) सनी राजु गायकवाड, वय-२४ वर्षे, रा. पत्राशेड, लिंकरोड, पिंपरी, पुणे.व ०२ विधीसंघर्षीत बालके यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकूण ७ गंभीर गुन्हे केल्याची नोंद आहे.
२) बावधन पोलिस ठाणे - आरोपी १) शुभम संभाजी गोळे, रा. पिरंगुट, ता. मुळशी, जि. पुणे (टोळी प्रमुख) २) ऋषीकेश ऊर्फ सागर संभाजी गोळे, वय ३१ वर्षे, रा. गोळे आळी, भैरवनाथ मंदीराजवळ, पिरंगुट, पुणे ३) महेश तानाजी कदम, वय २४ वर्षे, रा. लवळे फाटा, पिरंगुट, पुणे ४) संकेत ऊर्फ वाघ्या युवराज सोनवणे, वय २४ वर्षे, रा. सावरकरवाडी, पिरंगुट, पुणे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकूण ५ गंभीर गुन्हे केल्याची नोंद आहे.
३) हिंजवडी पोलिस ठाणे - आरोपी १) दयामन्ना ऊर्फ सुनिल यलप्पा शिवपुरे, वय ४३ वर्षे, रा. दत्त मंदिराच मागे, शिवाजीनगर, देहुरोड, पुणे (टोळी प्रमुख) २) दुर्गाप्पा कृष्णाप्पा श्रीराम, वय ४६ वर्षे, रा. दत्त मंदिराचे मागे, शिवाजीनगर, देहुरोड, पुणे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकूण १७ गंभीर गुन्हे केल्याची नोंद आहे.
४) निगडी पोलिस ठाणे - आरोपी १) रोहन मारुती गुंडीले, वय २२ वर्षे, रा. वृंदावन कॉलनी, बसेरा रेसीडन्सी समोर, रहाटणी, पुणे (टोळी प्रमुख) २) ओंकार राजेंद्र नलवडे, वय २३ वर्षे, रा. सावता माळी मंदीराजवळ, टॉवरलाईन, ताम्हाणे वस्ती, चिखली, पुणे ३) अरुण मोहन राठोड, वय २६ वर्षे, रा. सावता माळी मंदीराजवळ, टॉवरलाईन, ताम्हाणे वस्ती, चिखली, पुणे ४) अक्षय दगडु उळेकर, वय २२ वर्षे, रा. संतकृपा हौसींग सोसायटी, टॉवर लाईन, तळवडे, पुणे ५) अजित चंद्रकांत धायतोंडे, वय २४ वर्षे, रा. रोशेवाडी करमाळा, जि. सोलापूर यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकूण ५ गंभीर गुन्हे केल्याची नोंद आहे.
५) रावेत पोलिस ठाणे - आरोपी १) हुसेन इलियास डांगे, वय २० वर्षे, रा. लोढा बेलमांडो टॉवर नं. १६ फ्लॅट नं. १०१, गहुंजे, पुणे (टोळी प्रमुख) २) अमन अमीन शेख, वय २३ वर्षे, रा. मेन बाजार, सरदार पटेल रोड, देहुरोड ३) मियाँ युसूफ खान, रा. कृष्णानगर, एम.बी. कॅम्प, देहुरोड, पुणे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकूण ५ गंभीर गुन्हे केल्याची आहे.
६) चिंचवड पोलिस ठाणे - आरोपी १) बसुराज ऊर्फ बश्या शंकर हेळवे, वय २८ वर्षे, रा. चिंचवडेनगर, चिंचवड पुणे (टोळी प्रमुख) २) शुभम दत्तात्रय शिंदे, वय २७ वर्षे, रा. श्रीराम कॉलनी नं.३, बळवंत नगर, शिवनगरी रोड, चिंचवड पुणे ३) शाम शंकर कोळी, वय २१ वर्षे, रा. सोमाटणे फाटा शेजारी, इंद्रायणी सोसायटी, शिरगाव, ता. मावळ, जि. पुणे ४) सचिन ऊर्फ सोल्जर जट्टप्पा हेळवर, वय २२ वर्षे, रा. मोरया नगर, वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड, पुणे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकुण ११ गंभीर गुन्हे केल्याची नोंद आहे.
७) काळेवाडी पोलिस ठाणे - आरोपी १) वैभव व्यंकट नागझरकर, वय ३२ वर्षे, रा. सुर्यकिरण कॉलनी, जोतीबा नगर, काळेवाडी, पुणे (टोळी प्रमुख) २) रविदास संजय पाटेकर, वय २६ वर्षे, रा. मधुबन कॉलनी, तापकीर चौक, काळेवाडी यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकूण ४ गंभीर गुन्हे केल्याची नोंद आहे.
८) हिंजवडी पोलिस ठाणे - आरोपी १) जलालुद्दिन उर्फ सोनु निजामुद्दिन शेख, वय २८ वर्षे, रा. सदगुरू कॉलनी नं ०२, वाकड, पुणे (टोळी प्रमुख) २) ताजुद्दिन बदरुद्दिन शेख, वय-३१ वर्षे, रा. जांबे, ता. मुळशी, जि. पुणे ३) मोहम्मद तबरेज मोहम्मद अस्लम शेख, वय २४ वर्षे, रा. काळेवाडी, पाचपीर चौक, आझाद कॉलनी नं. ०२, पुणे ४) अरसलान महम्मद तांबोळी, वय १८ वर्षे, रा. पडवळनगर, लेन नं ०२, महेबुब बागवान यांच्या खोलीत, थेरगाव, पुणे मुळगाव - मु.पो. शिवलीता, ता. औसा, जि.लातूर ५) सोहेल समशेर उस्मानी, वय-२२ वर्षे, रा. पडवळनगर, लेन नं. ०३, गणपती मंदीराजवळ, थेरगाव, पुणे ६) कामरान महेमुद सैफी, वय २३ वर्षे, रा. धर्मात्मा सोसायटी, फ्लॅट नं १२, काळेवाडी, पुणे, मुळ पत्ता. ऐश्वर्यम हमारा सोसा., बि.नं.१२, फ्लॅट ५१५ मोशी, पुणे ७) बादीला आबीद नासर, वय २४ वर्षे, रा. पडवळनगर, लेन नं ०३, थेरगाव, पुणे मुळगाव- मु.पो. मानकेश्वर, ता.भूम, जि.धाराशिव ८) मोहम्मद मलंग सव्यद, वय-२० वर्षे, रा. सतराज खान यांचे खोलीत भाड्याने, माऊली चौक, वाकड, पुणे, मुळगाव- मु.पो. भूम ता.भूम, जि.धाराशिव ९) इब्राहिम हसन शेख, रा. देंडगे वस्ती, जांबे, ता. मुळशी, जि. पुणे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकूण ६ गंभीर गुन्हे केल्याची नोंद आहे.
९) चाकण दक्षिण पोलिस ठाणे - आरोपी १) विराज कृष्णा कड, वय २३ वर्षे, रा. कडाचीवाडी, ता. खेड, जि. पणे (टोळी प्रमुख) २) सत्यम दत्तात्रय कड वय २४ वर्षे, बापदेव वस्ती, मेदनकरवाडी, ता. खेड, जि.पूणे ३) ओमकार लक्ष्मण तेलप वय २० वर्षे रा. देवेद्रपार्क कडाचीवाडी, ता.खेड, जि. पूणे ४) शुभम संदीप हाके, वय १८ वर्षे, रा. यश पार्क, कडाचीवाडी, ता.खेड, जि. पुणे व ४ विधीसंघर्षीत बालके यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकुण १४ गंभीर गुन्हे केल्याची नोंद आहे.
१०) दिघी पोलिस ठाणे - आरोपी १) दिवाकर सुरेंद्र सिंग, वय २९ वर्षे, रा. फ्लॅट नंबर २०१, श्रीतेज बिल्डींग समर्थ नगर, दिघी ता. हवेली जि.पुणे (टोळी प्रमुख) २) अमोल अर्जुन गिरी ऊर्फ गिरीगोसावी, वय २८ वर्षे, रा. दिनेश चाळ, विठ्ठल मंदीराजवळ, गणेशनगर बोपखेल ता. हवेली जि. पुणे ३) करण अनिल मोळक, वय २१ वर्षे, रा. बापुजी बुआ मंदिराजवळ बोपखेल, ता. हवेली जि.पुणे ४) गणेश शिवाजी बांगर, वय २३ वर्षे, रा. परांडेनगर बस स्टॉपचे मागे, आग्रवाल यांचे खोलीत भाडयाने दिघी, ता. हवेली जि. पुणे ५) वैभव दादासाहेब बांगर, वय २१ वर्षे, रा. साईपार्क साईसिध्द कॉलनी, दिघी, ता. हवेली जि. पुणे व ०१ विधीसंघर्षीत बालक यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकूण १० गंभीर गुन्हे केल्याची नोंद आहे.
११) सांगवी पोलिस ठाणे - आरोपी १) विराज अदिकराव काटे, वय २० वर्षे, रा. आनंद पार्क, बंगला नंबर ५१, आय.टी.आय. रोड, औंध, पुणे (टोळी प्रमुख) २) आयुष नरेश गोहिरे, वय २१ वर्षे, रा. आयप्पा मंदिराशेजारी जयमालानगर, लेन नं. ०२, जुनी सांगवी, पुणे ३) आर्यन जालींदर थोरात, वय १८ वर्षे, रा. अजयदिप सोसा. जयमाला नगर-०६, जुनी सांगवी, पुणे ४) रितेश रविंद्र गुरव, वय १८ वर्षे, रा. भालेकरनगर गणपती मंदिराशेजारी, पिंपळे गुरव, पुणे ५) रितिकेश मनोज गोहिरे, वय २१ वर्षे, रा. आयप्पा मंदिराशेजारी जयमालानगर, लेन नं. ०२, जुनी सांगवी, पुणे ६) सागर कुपिंद्र जोगदणकर, वय २४ वर्षे, रा. जयश्री शिंदे यांचे भाड्याचे खोलीत, शिवनेरी नगर लेन नंबर १२, कोंढवा खुर्द, पुणे ७) शुभम बाळासाहेब ढवळे, वय २१ वर्षे, रा. जंजाळ यांचे खोलीत, लक्ष्मी नगर, गल्ली नंबर ०७ पिंपळे गुरव, पुणे ८) सिद्धांत गौतम निकाळजे, वय २३ वर्षे, रा. धोबी घाट शेजारी, पवनानगर, जुनी सांगवी, पुणे ९) मयंक ऊर्फ गुड्या महेंद्र गायकवाड, वय २७ वर्षे, रा. बुद्धघोष हौसिंग सोसायटी, प्लॉट नंबर १९, एस.टी. कॉलनी जवळ, जूनी सांगवी, पुणे व ०३ विधीसंघर्षीत बालके यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकूण ७ गंभीर गुन्हे केल्याची नोंद आहे.
१२) दापोडी पोलिस ठाणे - आरोपी १) विक्रांत ऊर्फ सरडा प्रकाश देवकुळे, वय २३ वर्ष रा. पडाळवस्ती, औंधरोड, पुणे (टोळी प्रमुख) २) गणेश बाबु बावधणे, वय वर्षे २१ रा- डॉ. आंबकडेकर चौक औंध खडकीरोड पुणे ३) पियुश रविकांत कांबळे, वय-१९ वर्षे, रा-भाऊ पाटील पडळवस्ती, औंधरोड पुणे ४) निलेश विश्वनाथ शिवगण, वय २८ वर्षे, रा. घर नं. ३८, औध रोड भाऊ पाटील रोड पडळवस्ती डॉ. सय्यद दवाखान्यामागे खडकी पुणे व ०१ विधिसंघर्षित बालक यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकूण ९ गंभीर गुन्हे केल्याची नोंद आहे.
१३) रावेत पोलिस ठाणे - आरोपी १) विनोद ऊर्फ विन्या निजप्पा गायकवाड, वय ३४ वर्षे, रा. रमाबाई नगर, रावेत, पुणे (टोळी प्रमुख) २) अक्षय प्रभाकर साबळे, वय ३२ वर्ष, रा.सी./ओ. सुदाम काळभोर, शितळादेवी चौक, काळभोरनगर, आकुर्डी, पुणे ३) शंतनु उर्फ भुषण कैलास भोसले, वय २१ वर्षे, रा. वृदांवन कॉलनी चिंचवडेनगर, चिंचवड, पुणे. यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकूण १२ गंभीर गुन्हे केल्याची नोंद आहे.
१४) एमआयडीसी भोसरी पोलिस ठाणे - आरोपी १) किशोर नारायण ढवळे वय २७ वर्षे रा. घर नं. ३, बनकर शाळेचे बाजुस, डॉल्फीन चौक, अपर डेपो, बिबवेवाडी, पुणे (टोळी प्रमुख) २) मनोज काळुराम गायकवाड वय ३४ वर्षे रा. १३ ताडीवाला रोड्, लोकसेवा वसाहत, पैलवान जीम, पुणे स्टेशन, पुणे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकूण ८ गंभीर गुन्हे केल्याची नोंद आढळुन आलेली आहे.
१५) काळेवाडी पोलिस ठाणे - आरोपी १) आदर्श ऊर्फ आद्या अनिल कामटीकर, वय-२४ वर्षे सध्या रा. साईविद्या अपार्टमेंट, सिंहगड सायन्स कॉलजचे समोर, अजिंक्यतारा अंबेगाव पुणे, मूळगाव महावीर चौक, वजिराबाद, नांदेड जि. नांदेड (टोळी प्रमुख) २) संजु किसन गुडमलवार, वय-३० वर्षे, सध्या रा. साईविद्या अपार्टमेंट, सिंहगड सायन्स कॉलजचे समोर, अजिंक्यतारा, अंबेगाव, पुणे. मूळगाव गुरुव्दारा गेट नं.२, नांदेड ३) संजय नरसिंमलू नक्का, वय २९ वर्षे, रा. नल्ला गुठ्ठा चाळ, सोमेश कॉलनी, कला मंदीरजवळ नांदेड यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकूण १० गंभीर गुन्हे केल्याची नोंद आहे.
१६) काळेवाडी पोलिस ठाणे - आरोपी १) विकी अनिल घोलप, वय २८ वर्षे, रा. लक्ष्मीगंगा अपार्टमेंट चिंचवडगाव, पुणे (टोळी प्रमुख) २) समीर कोंडीराम भोईर, वय २४ वर्षे, रा. केशवनगर भोईर आळी साईबाबा मंदिरा शेजारी चिंचवडगाव, पुणे ३) मंगेश नंदकुमार सांगळे, वय २४ वर्षे, रा. धिरजपार्क फ्लॅट नं. २० केशवनगर, चिंचवड पुणे ४) प्रसाद उर्फ सोन्या मारुती साबळे, वय-२३ वर्षे, रा- मोरेवस्ती, चिखली, पुणे. ५) शुभम विनायक चौधरी वय- २९ वर्षे रा. गावडे भोईर आळी पागेची तालीम चिंचवडगाव, पुणे ६) मयुर अनिल घोलप, वय ३० वर्षे, रा. लक्ष्मी गंगा अर्पा. चिंचवडगाव, पुणे. ७) आदित्य अशोक चव्हाण, वय-२१ वर्षे, रा- लोंढे चाळ नवीन तालेरा हॉस्पीटल जवळ चिंचवड, पुणे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकूण १२ गंभिर गुन्हे केल्याची नोंद आहे.