news
clock
'डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करा'  .......भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा भाजप कार्यकर्त्यांना आदेश

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करा' .......भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा भाजप कार्यकर्त्यांना आदेश

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करा'

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा भाजप कार्यकर्त्यांना आदेश 

पिंपरी, ता. ६ - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३५ वी जयंती दिमाखात साजरी करण्यासाठी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाच्या राज्यतील सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. बुथ लेव्हलपासून ते जिल्हाध्यक्षांपर्यंत प्रत्येक पक्षसदस्याने कार्यक्रमांच्या नियोजनात सक्रिय सहभाग घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या सूचनेनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, संविधानाचे पूजन, संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे सामूहिक वाचन, व्याख्यानांचे आयोजन केले जाणार आहे.  विविध भागातील कार्यकर्त्यांचा प्रतिष्ठित समाजभूषण पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. 

'मोदी सरकारने बाबासाहेबांच्या सन्मानासाठी केलेले कार्य' ,'अनुसूचित जाती-जमाती व गरीबांच्या कल्याणासाठी केलेल्या विशेष योजना' आणि 'काँग्रेसने भारतीय संविधानाचा केलेला अपमान' हे विषय व्याख्यानात समाविष्ट करण्याच्या सूचना चव्हाण यांनी दिल्या आहेत. भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संसदेमध्ये हमारा संविधान, हमारा स्वाभिमान याबाबत झालेल्या विशेष चर्चेतील पंतप्रधान मोदी यांचे ऐतिहासिक भाषणाची चित्रफित दाखवण्याची सूचनाही दिली आहे.

भारतीय जनता पक्षातर्फे यापूर्वी प्रतिमा पूजन वगळता अन्य कुठले कार्यक्रम घेतले जात नव्हते. यंदा, प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. त्यामुळे, पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. 





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories