सार्वजनिक ठिकाणी वेश्याव्यवसायाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेवर गुन्हा
पिंपरी, ता. ९ - वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी (ता. ८) श्री गुरु देहुकर महाराज फड श्री क्षेत्र आळंदी या लोखंडी कमानीच्या जवळील चाकणकडे जााणाऱ्या रस्त्यावर ही महिला गैरवर्तन करताना आढळली.
पिंपरी-चिंचवड पोलीस उपनिरीक्षक सुनिल जगन्नाथ शिरसाट याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार, महिलेविरोधात अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी महिला सार्वजनिक ठिकाणी डोळ्याने खुणा करत व हाताने लैंगिक हावभाव करुन वेश्याव्यवसायाचा प्रयत्न करत होती. तिच्या वर्तनामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण होत होता व सार्वजनिक शिष्टाचाराचा भंग होत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दिघी पोलिस ठाण्यात महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.