पिंपरी-चिंचवड पोलिसांचे 'ऑपरेश मुस्कान' यशस्वी, हरवलेल्या १२१ बालकांचा लावला शोध  

पिंपरी, ता. २६ - महाराष्ट्र पोलिसांकडून १४ वर्षाखालील हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी २० जानेवारी २०२६ ते २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत "ऑपरेशन मुस्कान-१४" ही शोधमोहिम राबवण्यात आली. यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलिस दलाने त्यांच्या हद्दीत हरवलेल्या २८६ बालकांपैकी एकूण १२१ बालकांना शोधून त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे. 

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे,  पोलीस सह आयुक्त  शशिकांत महावरकर,  अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग)  बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस उप आयुक्त, सर्व सहा. पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा यांनी केली आहे.

 पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांत भारतीय दंड विधान कलम ३६३ व भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२) अन्वये दाखल असलेल्या गुन्हयाचा आढावा घेतला असता नमूद कालावधीतील ३० बालके व १८४ बालिका असे एकुण २१४ बालके हरवल्याबाबत गुन्हे नोंद होते.  "ऑपरेश मुस्कान-१४” मध्ये एकूण ११ बालके व ६० बालिका असे एकूण ७१ बालकांना शोधुन त्यांचे पालकांच्या ताब्यात दिले आहे. तसेच २० जानेवारी २०२६ ते  २० फेब्रुवारी २०२६ दरम्यान भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२) अन्वये दाखल असलेल्या गुन्हयामध्ये २२ बालके व ५० बालिका असे एकूण ७२ बालके हरविली होती. सदर मोहिमेत त्यांचाही शोध घेऊन १६ बालके व ३४ बालिका असे एकूण ५० बालकांचा यशस्वीरित्या शोध घेतला आहे.

एकूणच ऑपरेन मुस्कानमध्ये पिंपरी-चिंचवड पोलिसांनी २७ बालके व ९४ बालिका अशा एकूण १२१ बालकांचा यशस्वीरित्या शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात दिले आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, मा. पोलीस सह आयुक्त श्री. शशिकांत महावरकर, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. सारंग आवड, मा. अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) श्री. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस उप आयुक्त, सर्व सहा. पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा यांनी केली आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance