मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी अधिकारी संजय कुलकर्णी व योगेश आल्हाट यांचे निलंबन

मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी अधिकारी संजय कुलकर्णी व योगेश आल्हाट यांचे निलंबन

मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी अधिकारी संजय कुलकर्णी व योगेश आल्हाट यांचे निलंबन

पिंपरी, ता. १५ जुलै २०२६ -  मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी आहे. महापालिकेचे मुख्य अभियंता व पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांचे निलंबन करण्यात आले आहे. दोघांचेही निलंबन सहा महिने कालावधीसाठी असणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी (ता. १४) हा आदेश दिला आहे. 

सोमवारी (ता. १३) आयुक्तांनी सोमवारी (ता. १३) या दोघांकडील पदभार काढून घेऊन त्यांना सुरक्षिततेतील गंभीर निष्काळजीपणाबाबत कारणे दाखवा नोटिस बजावली होती. दोन्ही अधिकाऱ्यांनी आपला कायदेशीर, मुद्देनिहाय व  समर्थनीय खुलासा मंगळवार, दिनांक १४ जुलै २०२६ रोजी सायं ५.०० वा. पर्यंत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे समक्ष सादर करायचा होता. 

अधिकाऱ्यांच्या या गंभीर निष्काळजीपणाबद्दल महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ५६(२) व महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ अन्वये  कडक शिस्तभंगाची विभागीय चौकशीची कारवाई का करण्यात येऊ नये ? त्याचप्रमाणे जीवितहानीच्या दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करून सेवेतून तात्काळ निलंबित (Suspend) का करण्यात येऊ नये? यांचा याबाबत सविस्तर व समर्थनीय खुलासा नमुद मुदतीत सादर करावा.दिलेल्या मुदतीत खुलासा सादर न केल्यास,अथवा केलेला खुलासा असमाधानकारक आढळल्यास तुमच्या विरुध्द नोटिशीत नमूद केले होते. त्यानुसार, अधिकारी संजय कुलकर्णी व योगेश आल्हाट यांना सहा महिन्यांसाठी सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories