महापालिका शाळेतील पाचवीच्या विद्यार्थिंनींनी बनवले   जन्मतारखेवर आधारित 'क्यूआर कोड'

महापालिका शाळेतील पाचवीच्या विद्यार्थिंनींनी बनवले जन्मतारखेवर आधारित 'क्यूआर कोड'

महापालिका शाळेतील पाचवीच्या विद्यार्थिंनींनी बनवले   जन्मतारखेवर आधारित 'क्यूआर कोड' 

पिंपरी, ता. २६ - कोडिंग प्रणालीचे प्राथमिक ज्ञान आत्मसात करुन महापालिकेच्या पाचवीतील विद्यार्थिंनींनी जन्मतारखेवर आधारित 'क्यूआर कोड' तयार केला आहे. ही कामगिरी करणाऱ्या या विद्यार्थिनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील सावित्रीबाई फुले कन्या शाळा क्रमांक १०७ शाळेच्या आहेत.या  विद्यार्थिनींचे  तांत्रिक ज्ञान व कल्पकता कौतुकास्पद आहे. 

'क्यूआर कोड' तयार केलेल्या विद्यार्थिनींची नावे आहेत... आरोही शुक्ला, सौम्या नारखेडे, मनस्वी ताडमे आणि अवनी नुच्चे.  या विद्यार्थिनींनी 'टॅब बडी' उपक्रमांतर्गत कोडींग विषयाचा अभ्यास केला. 'जन्मतारखेची माहिती क्यूआर कोडमध्ये कशी रुपांतरित करायची' याविषयीच्या शैक्षणिक ध्वनिचित्रफीतीची मदत घेतली आणि तयार केले स्वतःच्या तसेच मित्रमैत्रिणींच्या जन्मतारखेचे क्यूआर कोड.

आरोही  व सौम्या या विद्यार्थिनी अनिमेशन व्हीडीओ प्रभावीपणे तयार आहेत. यूट्यूबवरील मार्गदर्शक व्हिडिओंचा अभ्यास करुन मुलींनी त्यांनी हे कौशल्य स्वतःच्या प्रयत्नांतून आत्मसात केले आहे.

या उपक्रमासाठी पर्यवेक्षिका सुनीता गीते, मुख्याध्यापिका सुरेखा डांगे आणि वर्गशिक्षिका रुपाली घोडेकर यांनी मार्गदर्शन केले. वर्गशिक्षिका रुपाली घोडेकर म्हणाल्या, ''महापालिका शाळांमधील विद्यार्थिनी डिजिटल युगाशी सुसंगत कौशल्ये आत्मसात करत आहेत. भविष्यातील संधींसाठी सक्षम होत आहेत. '' महापौर रवी लांडगे यांनीही विद्यार्थिनींचे कौतुक केले. शाळेच्या सर्व शिक्षकांनी या गुणी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories