news
clock

यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प औद्योगिक विकासासाठी सकारात्मक - संदीप बेलसरे

पिंपरी, ता. ६ - राज्याचा अर्थसंकल्प आज, शुक्रवारी (ता. ६)  राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केला. यंदाचा अर्थसंकल्प राज्याच्या औद्योगिक विकासासाठी सकारात्मक आहे अशी प्रतिक्रीया पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदिप बेलसरे यांनी व्यक्त केली आहे. अर्थसंकल्पामध्ये घोषित केलेल्या योजनांच्या अमंलबाजवणी करताना काही अपेक्षा बेलसरे यांनी व्यक्त केल्या आहेत. 

बेलसरे म्हणाले, '' अर्थसंकल्पात उद्योग, गुंतवणूक आणि सेवा धोरण - २०२५ जाहीर केले आहे. त्याचा उद्देश

राज्याच्या औद्योगिक क्षेत्राचे एकूण उत्पादन वाढवणे हा आहे. त्यासाठी  प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या औद्योगिक क्लस्टरची स्थापना केली जाईल. सन २०४७ पर्यंत राज्याच्या उत्पन्नामध्ये उद्योगांचा वाटा ३०% पर्यंत वाढेल. 'इन्वेस्ट महाराष्ट्र' नावाचे एक डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केले जात आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात लघु आणि मध्यम उद्योग केंद्र स्थापन केली जातील. या धोरणामुळे सुमारे ५ दशलक्ष नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी तसेच सेवा क्षेत्रासाठी स्वतंत्र आयुक्तालय स्थापन केले जाईल. या घोषणेचे स्वागत पण प्रभावी अंमलबजावणी व पुरवठा साखळीतल्या लघु व सुक्ष्म उद्योगांना पण याचा फायदा झाला पाहिजे.''

''सूक्ष्म आणि लघु उद्योगांना कर्ज दिले जाईल. इन्वेस्ट महाराष्ट्र डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला जात आहे. तसेच राज्यातील सूक्ष्म आणि लघु उद्योगांना प्रोत्साहित करण्यासाठी स्वतंत्र कमिशनर कार्यालय स्थापन केले जाईल. यामध्ये, बँक व वित्तीय संस्था यांच्याकडून सहजरित्या कर्ज उपलब्ध होईल याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. सुक्ष्म व लघुउद्योगांसाठी स्वतंत्र विभाग किंवा कमिशनर कार्यालय स्थापन केले तर त्यांचा जलद विकास होईल व त्यांची वार्षिक उलाढाल वाढेल व आर्थिक विकास होईल. स्टार्टअपसाठी महाफंड निर्माण करुन त्यांना वित्तीय कर्जपुरवठा सुलभ केला तर नवउद्योजकांना प्रोत्साहन मिळेल व रोजगार निर्मिती होईल. '' अशी अपेक्षा बेलसरे यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories