news
clock

शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अर्थसंकल्पात घोषणा 

पुणे, ता.  ६ -  राज्याचा अर्थसंकल्प आज, शुक्रवारी (ता. ६)  राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना फडणवीस यांनी राज्याच्या कृषी क्षेत्रावर विशेष भर दिला जाणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,  ''राज्याचा कृषी क्षेत्राचे सरासरी (जीडीपी) उत्पन्न सध्या ५५ अब्ज डॉलर असून ते २०४७ पर्यंत ५०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून १० ते १५ ठिकाणी एकत्रित मूल्यसाखळी (व्हॅल्यू चेन) उभारण्याची योजना राबविण्यात येणार आहे. सध्या ३० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना हवामान व बाजारभावाची माहिती देण्यात येत आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर सुरु करण्यात आला असून त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे. ''

''केंद्र सरकारच्या एग्रीस्टॅक योजनेअंतर्गत राज्यात फेब्रुवारीपर्यंत १ कोटी ३१ लाख 'फार्मर आयडी' तयार करण्यात आले आहेत. राज्यातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी पुढील चार वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. महिला गोपालक व शेळीपालकांसाठीही विशेष योजना  असेल. अर्थव्यवस्थेचा आकार १२३ अब्ज डॉलरवरुन १५०० अब्ज डॉलरपर्यंत वाढविण्याचा उद्देश असून महाराष्ट्राला जागतिक उत्पादन केंद्र बनविण्याचा निर्धार आहे.'' असे फडणवीस यांनी सांगितले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories