प्रभाग क्रमांक १ मधील  पाण्याचा प्रश्न सोडवावा, अन्यथा नागरीक तीव्र आंदोलन करु

प्रभाग क्रमांक १ मधील पाण्याचा प्रश्न सोडवावा, अन्यथा नागरीक तीव्र आंदोलन करु

प्रभाग क्रमांक १ मधील  पाण्याचा प्रश्न सोडवावा, अन्यथा नागरीक तीव्र आंदोलन करु 

नगरसेविका संगिता ताम्हाणे यांचा प्रशासनाला इशारा, आयुक्तांना दिले निवेदन 

पिंपरी, ता. २३ - प्रभाग क्रमांक १ मधील चिखली गावठाण भाग, पाटीलनगर, गणेशनगर, मोरेवस्ती भाग, सोनवणे वस्ती या भागातील नागरीक विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे हैराण झाले आहेत. प्रशासनाने या प्रशानाची तत्काळ दखल घेऊन येत्या ८-१० दिवसांत पाण्याचा प्रश्न सोडवावा. अन्यथा आम्ही नागरीक तीव्र आंदोलन करु, असा इशारा नगरसेविका संगीता ताम्हाणे यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.  

याबाबत ताम्हाणे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी सांगितले आहे की, आमच्या प्रभाग क्रमांक १ मध्ये अनेक ठिकाणी पाणी येतच नाही आणि आले तरी अतिशय कमी दाबाने येते. त्यामुळे, अक्षरशः अंघोळीसाठी आणि स्वच्छतागृहात वापरायलाही पाणी नाही इतकी वाईट परिस्थिती आहे. वैतागलेले नागरीक रोज माझ्या घरी येऊन ही व्यथा मांडत आहेत. 

महापालिका आयुक्तांनी नागरीकांच्या या महत्वाच्या प्रश्नाकडे त्वरीत गांभिर्याने लक्ष द्यावे आणि ८ ते १० दिवसांत हा पाण्याचा प्रश्न सोडवावा.  अन्यथा नागरीक तीव्र आंदोलन करतील. आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास आम्ही लोकप्रतिनिधी जबाबदार राहणार नाही, असे संगिता ताम्हाणे यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories