सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या महिलांविरोधात गुन्हा दाखल
पिंपरी, ता. ६ - वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने आळंदी परिसरात सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या दोन महिलांविरोधात दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीत इंद्रायणी घाट शेजारील मोकळ्या जागेत, पुणे-आळंदी रोडवर रविवारी (ता. ५) सायंकाळी सुमारे ६.१५ वाजता ही कारवाई करण्यात आली. पोलिस शिपाई सुभाष पाटील यांच्या फिर्यादीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आरोपी सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करत तसेच शब्द उच्चारुन येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना त्रास देत होत्या. यामुळे सार्वजनिक शिष्टाचाराचा भंग होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या प्रकरणी रविवारी (ता. ५) दिघी पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ च्या कलम ८ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोन्ही महिला आरोपींना बीएनएस कायदा कलम ३५(३) अन्वये नोटीस देण्यात आली आहे.