बावधन येथे वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने गैरवर्तन करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल
पिंपरी, ता. १ - बावधन येथे वेश्याव्यवसाच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या महिलेविरोधात पोलिसांनी मंगळवारी (ता. ३१) अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे व तिला नोटीस बजावली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन येथील बेंगलोर-मुंबई हायवे सर्विस रोडलगत असलेल्या ग्रीन पार्क लॉजच्या बाजूला पत्र्याच्या शेडसमोर संबंधित महिला संशयास्पद हालचाली करताना आढळली. ती वेश्याव्यवसाय करण्याच्या उद्देशाने येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना खुणा, गैर शब्दोच्चार व हातवारे करुन लैंगिक हावभाव करत होती.
संबंधित महिलेच्या या गैरवर्तनामुळे सार्वजनिक शिष्टाचार व सभ्यतेचा भंग होत असल्याने अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम ८ अन्वये संबंधित महिले विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी महिलेस नोटीस बजावण्यात आली आहे.