news
clock
किरकोळ कारणावरुन टेम्पोचालकाला लोखंडी पाइपने मारहाण, भोसरीतील घटना

किरकोळ कारणावरुन टेम्पोचालकाला लोखंडी पाइपने मारहाण, भोसरीतील घटना

किरकोळ कारणावरुन टेम्पोचालकाला लोखंडी पाइपने मारहाण, भोसरीतील घटना 

पिंपरी, ता. ३ - इंद्रायणीनगर-भोसरी परिसरात किरकोळ वादातून एका वाहनचालकावर लोखंडी पाइपने हल्ला केल्याची घटना १ एप्रिलला घडली आहे.  या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.

याबाबत, टेम्पोचालक बबलू इस्माईल शेख (वय ४१ वर्षे, रा. एम.आय.ड.सी. भोसरी) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबलू इस्माईल शेख हे १ एप्रिल रोजी रात्री सुमारे १०.४५ वाजता इंद्रायणी नगर येथील कंपनीत माल उतरवून आपल्या छोटा हत्ती वाहनाने फरमाईश हॉटेलसमोरुन जात होते. यावेळी रस्ता दुभाजकाजवळ वळण घेत असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराला त्यांनी सावधगिरीचा इशारा दिला.

या कारणावरुन आरोपी रितेशकुमार संतोष राम (वय २२, रा. पिंपरी) याने संतापून वाहन थांबवले आणि शिवीगाळ करत फिर्यादीजवळ आला. त्यानंतर फिर्यादी वाहनातून खाली उतरत असताना आरोपीने वाहनातील लोखंडी पाइप काढून त्यांच्या डोक्यावर वार केले. या हल्ल्यात शेख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

घटनेनंतर जखमी शेख यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. २) भारतीय न्याय संहिता कलम ११८(१) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories