news
clock
माझा सन्मान लोककलेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक कलावंताचा सन्मान - पद्मश्री रघुवीर खेडेकर

माझा सन्मान लोककलेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक कलावंताचा सन्मान - पद्मश्री रघुवीर खेडेकर

माझा सन्मान लोककलेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक कलावंताचा सन्मान - पद्मश्री रघुवीर खेडेकर 

पिंपरी, ता. २८ - ''पिंपरी-चिंचवड या उद्योगनगरीत महापालिकेने माझा नागरी सन्मान करुन सर्व कलावंतांचा गौरव केला आहे. हा सन्मान केवळ माझा वैयक्तिक सन्मान नसून तमाशा आणि लोककलेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक कलावंताचा सन्मान आहे. या गौरवामुळे नव्या ऊर्जेने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.'' असे मत ज्येष्ठ तमाशा कलावंत पद्मश्री रघुवीर तुकाराम खेडकर यांनी शुक्रवारी (ता. २७) व्यक्त केले.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.उपमहापौर महापालिकेच्या शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेविका सुप्रिया चांदगुडे, अनुराधा गोरखे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, प्राचार्य शशिकांत पाटील, शफी शेख उपस्थित होते. 

खेडेकर यांनी मनोगतात आपले लोककलेच्या क्षेत्रातील अनुभव सांगितले. ते म्हणाले, ''तमाशा सादर   करताना अनेक वेळा मी विनामूल्य कार्यक्रम केले आणि कित्येकदा तर पाण्याचीही अपेक्षा ठेवली नाही. तमाशामध्ये थोडे वेगळेपण आणण्यासाठी मी तीन वर्षे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले आणि ते तमाशात समाविष्ट केले. हा बदल नंतर लोकांना आवडू लागला. माझी कला मी जुन्या कलावंतांकडून शिकलेलो आहे या काळातील पद्धतीच मी पुढे नेली. सरकारने माझ्यासारख्या तमाशा कलावंताची दखल घेत मला पद्मश्री पुरस्कार प्रदान केला. या मला मोठा आनंद व अभिमान आहे.'' राजू मोहन यांनी प्रास्ताविक केले. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories