news
clock
पंढरपुरात अद्ययावत क्रिडा संकुल उभारण्याच्या मागणीसाठी युवा सेनेचे क्रिकेट खेळून आंदोलन

पंढरपुरात अद्ययावत क्रिडा संकुल उभारण्याच्या मागणीसाठी युवा सेनेचे क्रिकेट खेळून आंदोलन

पंढरपुरात अद्ययावत क्रिडा संकुल उभारण्याच्या मागणीसाठी युवा सेनेचे क्रिकेट खेळून आंदोलन

पिंपरी, ता. २५ - पंढरपुरात अद्ययावत क्रिडा संकुल उभारण्याच्या मागणीसाठी युवा सेनेने (ठाकरे गट) क्रिकेट खेळून आंदोलन केले.  युवा सेनेचे शहराध्यक्ष संग्राम अभंगराव यांच्या नेतृत्वाखाली हे अनोखे आंदोलन शिवाजी महाराज चौकात करण्यात आले. आंदोलनादरम्यान चौकामध्ये वाहतुकीची कोंडी झाली होती.

पंढरपूर शहरामध्ये सर्व सोयींनीयुक्त असे क्रीडासंकुल उभारावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. परंतु, या मागणीकडे लोकप्रतिनिधी व शासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप युवा सेनेने केला आहे. या आंदोलनामध्ये खेळाडूंचा क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संग्राम अभंगराव म्हणाले, ''पंढरपूर परिसरामध्ये अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केली आहे. अनेक खेळाडू विविध ठिकाणी जाऊन सराव करत आहेत. स्थानिक खेळाडूंना बाहेरगावी जाऊन सराव करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने खेळाडूंची आर्थिक कुचुंबना होत आहे.  सध्या पंढरपूर विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे. या विकास आराखड्यात क्रीडा संकुलाचा समावेश करावा. अन्यथा येत्या काळात क्रिडा संकुलाच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन केले जाईल.'' 

आंदोलनामध्ये यावेळी क्रिकेटप्रेमी विजय अभंगराव, स्वप्नील शिरसाट, वैभव बडवे, अर्जुन पवार, अवधूत बडवे, अमित पाटेकर, आनंद मिलगे, सूरज पेंडाल, पैलवान सिद्धेश्वर कोरे, अनिल परमार, महावीर अभंगराव, समाधान रोंगे, विविध क्रीडाप्रेमी, क्रीडापटू तसेच शहर युवा सेनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories