स्थायी समिती सभापती निवड अन् महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार 'येत्या शनिवारी' 

पिंपरी, ता. २५ - महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतींची निवड शनिवारी (ता. २८) विशेष सभेत होणार आहे. त्यानंतर शनिवारीच पिंपरी-चिंचवड महापालिकेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर स्थायी समितीपुढे सादर करणार आहेत. त्यासाठी महापालिका प्रशासन तयारी करत आहे, असे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.  

आर्थिक वर्ष सुरु होण्यापूर्वी नवीन आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला जातो. नियमानुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प साधारणपणे दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस म्हणजे तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात स्थायी समितीच्या अध्यक्षांना सादर केला जातो. त्यानुसार, यंदा स्थायी समिती सभापती निवड व त्याच दिवशी समितीची विशेष सभा घेऊन अर्थसंकल्प सादर केला जाईल. 

स्थायी समितीच्या या विशेष सभेची विषयपत्रिका तयार करण्यात आली आहे. महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात शनिवारी दुपारी बारा वाजता यासाठी विशेष सभा होईल. या सभेत आयुक्त हर्डीकर स्थायी समितीपुढे हा अर्थसंकल्प सादर करतील. वास्तववादी अर्थसंकल्प तयार करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे, असे प्रशासनाने सांगितले आहे.  केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अर्थसंकल्पाचे काम पूर्ण ....

''यंदा अर्थसंकल्प तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. आयुक्तांच्या निर्देशानुसार, अर्थसंकल्प सादरीकरणासाठी स्थायी समितीची विशेष सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.''

- प्रवीण जैन, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, महापालिका


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance