news
clock
पिंपरी-चिंचवड शहराची पाणीपट्टी थकली, थकबाकीच्या रकमेतील २० कोटी रुपये महापालिकेने भरले

पिंपरी-चिंचवड शहराची पाणीपट्टी थकली, थकबाकीच्या रकमेतील २० कोटी रुपये महापालिकेने भरले

पिंपरी-चिंचवड शहराची पाणीपट्टी थकली, थकबाकीच्या रकमेतील २० कोटी रुपये महापालिकेने भरले

पिंपरी, ता. ३१ - पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे शहराच्या पाणीपट्टीची थकबाकी आहे. थकबाकीची रक्कम पूर्ण न भरल्याने जलसंपदा विभागाने पवना धरणातून शहरासाठीचा  विसर्ग  रविवारी (ता.२९) सायंकाळपासून कमी केला होता. थकबाकी रकमेतील २० कोटी रुपये सोमवारी सकाळी भरले. त्यानंतर जलसंपदा विभाग प्रशासनाने पाण्याचा विसर्ग पूर्ववत केला आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

पवना धरणातून पिंपरी-चिंचवडसाठी दिल्या जाणाऱ्या पाण्यासाठीची पाणीपट्टी थकबाकीसह १४३ कोटी रुपये भरा, अन्यथा पाणीपुरवठा खंडित केला जाईल, अशी नोटीस जलसंपदा विभागाने गेल्या आठवड्यात महापालिकेला दिली होती. त्यावर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन अधिकाधिक रक्कम भरण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, महापालिकेने जलसंपदा विभागाला थकबाकीच्या रकमेपैकी २० कोटी रुपये सोमवारी सकाळी भरले. 

शहरात पाणीपुरवठा तातडीने सुरु झाला आहे. संपूर्ण शहरात नियमित होण्यासाठी किमान एक आठवड्याचा कालावधी लागू शकतो. तोपर्यंत नागरिकांनी संयम राखावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

शहरातील पाणीपुरवठा सुरळीत....

''महापालिकेने जलसंपदा विभागाला थकबाकीच्या रकमेपैकी २० कोटी रुपये सोमवारी सकाळी भरले. शिवाय, शहरातील पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरु आहे.''

- अजय सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता, महापालिका

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories