news
clock
मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन अभ्याक्रमासाठी यंदा विद्यार्थीसंख्या घटली

मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन अभ्याक्रमासाठी यंदा विद्यार्थीसंख्या घटली

मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन अभ्याक्रमासाठी यंदा विद्यार्थीसंख्या घटली

पिंपरी, ता. २७ - मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (एमसीए) या अभ्यासक्रमासाठी गेल्यावर्षीच्या तुलनेमध्ये यंदा कमी विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यंदा सीईटी प्रवेश नोंदणीत ५५ हजार ५४२ अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली. 

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (एमसीए) व मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (एम. एचएमसीटी) या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सीईटी प्रवेश नोंदणी २३ फेब्रुवारी २०२६ रोजी संपली आहे. 'एमसीए' अभ्यासक्रमासाठी यंदा ५५ हजार ५४२ विद्यार्थ्यांनी अंतिम नोंदणी केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ७१५ विद्यार्थ्यांची नोंदणी कमी झाली आहे.

या दोन्ही अभ्यासक्रमांस अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या नोंदणी अर्जामध्ये काही दुरुस्त्या असतील तर शनिवार (दि. २८) पर्यंत ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या लॉगीनमध्ये जाऊन ही दुरुस्ती करावयाची आहे, असे सीईटी सेलकडून कळवण्यात आले आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories