भारतीय जैन संघटना प्राथमिक विद्यालयाची 'प्लास्टिकचा भस्मासुर' एकांकिका विजेती

भारतीय जैन संघटना प्राथमिक विद्यालयाची 'प्लास्टिकचा भस्मासुर' एकांकिका विजेती

भारतीय जैन संघटना प्राथमिक विद्यालयाची 'प्लास्टिकचा भस्मासुर' एकांकिका विजेती 

पिंपरी, ता. २० -  'विज्ञानधारा' विज्ञान एकांकिका स्पर्धेत पिंपरीतील संत येथील तुकारामनगर भारतीय जैन संघटना प्राथमिक विद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. 'प्लास्टिकचा भस्मासुर' ही विज्ञान एकांकिका विद्यार्थ्यांनी सादर केली. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान शिक्षण आणि संप्रेषण केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व ग्रंथाली प्रतिभांगण, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 

विद्यालयाने सादर केलेल्या या एकांकिकेत वेदांत वाळुंज, तन्वी खडसे, उन्नती माने, नंदिनी बिरुणगीकर, श्रमिका धाईजे आणि श्रावणी मनोहर या विद्यार्थ्यांनी अभिनय केला. दिग्दर्शन विलास गुंजाळ यांनी केले असून अरुणा धिवार आणि स्नेहलता वाडेकर यांनी सहकार्य केले. दीपिका सावंत, शैला बर्वे, प्रदीप बोरसे आणि अपर्णा कुमठेकर यांनी मार्गदर्शन केले.

डॉ. अंजली क्षीरसागर, प्रियदर्शिनी कर्वे आणि सुप्रिया बडवे यांच्या हस्ते संघाला व विलास गुंजाळ यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. संजय जाधव, दिलीपकुमार देशमुख, संतोष भंडारी, अविनाश यादवडकर, गजानन वाढे व पांडुरंग पवार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories