विज्ञान दिनानिमित्त सायन्स पार्कमध्ये २७ फेब्रुवारी ते २ मार्चपर्यंत विज्ञानविषयक कार्यक्रम 

पिंपरी, ता. २७ - राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क व कल्पकघर यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान विविध विज्ञान विषयक कार्यक्रमांचे आयोजन चिंचवड येथील सायन्स पार्कमध्ये करण्यात आले आहे.

या कार्यक्रमांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी हॅकेथॉन व स्टेम स्पर्धा, लोकप्रिय विज्ञान आणि तंत्रज्ञानावरील शास्त्रज्ञांची व्याख्याने,  विज्ञानविषयक प्रात्यक्षिके व विद्यार्थी आणि शिक्षकांचे स्टेम मॉडेल प्रदर्शन असे विविध कार्यक्रम होणार आहे.  इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष रोबोटिक्स व कोडिंग एंगेजमेंट सेशन आयोजित करण्यात आले आहे. हा एक तासाचा विनामूल्य उपक्रम असून मर्यादित प्रवेशाच्या तत्त्वावर नोंदणी केली जाणार आहे. 

सर्व कार्यक्रम पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क येथे होणार आहेत. शिक्षक-विद्यार्थी व इतर नागरीकांनी या कार्यक्रमांत सहभागी होऊन राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करावा असे, आवाहन सायन्स पार्कच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance