'पीएमआरडीए'च्या सदनिकांना नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

पिंपरी, ता. २५ - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) गृहयोजनेमध्ये मोशी व वाल्हेकरवाडी येथे ८३३ सदनिकांचा प्रकल्प तयार आहे. या सदनिकांसाठी ५ हजार ८४२ नागरिकांनी नोंदणी केली आहे त्यापैकी त्यापैकी ५ हजार ३६६ अर्जदारांनी अनामत रक्कम भरुन प्रक्रियेतील आपले स्थान निश्चित केले आहे, अशी माहिती पीएमआरडीएकडून देण्यात आली.

या सदनिकांसाठी अर्ज करण्यासाठी २० फेब्रुवारी ही अंतिम मुदत होती.  दिलेल्या मुदतीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील हजारो नागरिकांनी अनामत रक्कम भरली आहे. या अनामत रक्कमेद्वारे पीएमआरडीएकडे एकूण ४ कोटी ४१ लाख ५४ हजार १२८ रुपये अनामत रक्कम जमा झाली आहे. 'अर्जाच्या छाननीनंतर लवकरच पात्र उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर संगणकीय पद्धतीने पारदर्शकपणे सोडत काढली जाईल,' असे पीएमआरडीए प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance