बावधन परिसरात वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने गैरवर्तन करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल
Apr 10 2026
52
बावधन परिसरात वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने गैरवर्तन करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल
पिंपरी, ता. १० - बावधन परिसरात बेंगलोर–मुंबई महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर असलेल्या ग्रीन पार्क लॉजजवळ वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने गैरवर्तन करणाऱ्या महिलेविरोधात गुरुवारी (ता. ९) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी गणेश सिताराम कारोटे (वय ३८, पोलीस हवालदार बक्कल नं. १७६८), नेमणूक अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे की, संबंधित महिला आरोपीने सार्वजनिक ठिकाणी वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने शब्द उच्चारणे, डोळ्याने खुणावणे तसेच हाताने लैंगिक स्वरूपाचे इशारे करून सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्यांना अडथळा निर्माण केला.
या प्रकारामुळे सार्वजनिक शिष्टाचार व सभ्यतेचा भंग झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सदर प्रकरणात महिला आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
महिलेविरोधात बावधन पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.