मावळात पुणे-मुंबई हायवेवर अपघातात १५ वर्षीय मुलाचा मृत्यू
पिंपरी, ता. ९ - बेफिकीरपणे वाहन चालवल्यामुळे झालेल्या अपघातात भाऊच आपल्या भावाच्या मृ्त्यूस कारणीभूत ठरला आहे. दोन चुलत भावांमधील लहान भावाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी (ता. ८) मावळातील रात्री ३ वाजता पुणे-मुंबई हायवेवर (८३ किमी) घडला आहे. दर्शन अभिजीत शहा (वय १५) असे मरण पावलेल्या मुलाचे नाव आहे.
अश्वेश राजेश सांवत (वय ३२, रा. विरार, मुंबई) यांनी याबाबत शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आदित्य उदय शहा (वय ३०, रा. वीटा, सांगली) आणि मयत दर्शन हे चुलत भाऊ असून ते एकाच गाडीत शेजारी बसले होते. शहा आपल्या कारने मुंबईकडे जात असताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले व समोरच्या अज्ञात वाहनाला धडक दिली. त्यानंतर त्यांची कार उजव्या बाजूस असलेल्या डिव्हायडरला धडकली.
या अपघातात दर्शन गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडला. आरोपी शहाही जखमी झाला. फिर्यादी अश्वेश सांवत याला किरकोळ दुखापत झाली,आरोपीविरोधात शिरगाव पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहीता कलम १०६ (A), २८१,१२५ (A), १२५ (ए) मो. वा, का. कलम, १८४ प्रमाणे गुन्हा दाकल करण्यात आला आहे.