पथदिव्यांनी उजळला पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील उड्डाणपूल

पथदिव्यांनी उजळला पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील उड्डाणपूल

पथदिव्यांनी उजळला पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील उड्डाणपूल

पुणे, ता. २७ - पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील उड्डाणपुलावरील सर्व पथदिवे नुकतेच सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळे, स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. याशिवाय, रात्री दिव्यांच्या प्रकाशांत हा रस्ता सुंदर दिसू लागला आहे.  

पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील उड्डाणपुलावरील पथदिवे दीर्घकाळ बंद होते. त्यामुळे येथून प्रवास करताना असुरक्षित वाटायचे. पथदिवे बंद असल्याने वारंवार अपघातांची शक्यता होती. नागरीकांच्या सुरक्षेसाठी हे पथदिवे लवकरात लवकर दुरुस्त करावेत ही मागणी सातत्याने होत होती आणि अखेर प्रशासनाने हा विषय मार्गी लावला आहे. नुकतेच या महामार्गावरील सर्व पथदिवे सुरु केले आहेत. 

आता, नियमितपणे प्रशासनाने या पथदिव्यांची देखभाल करावी व हा रस्ता नेहमी प्रकाशमान ठेवावा, अशी अपेक्षा नागरीकांनी व्यक्त केली आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories