news
clock
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात सुरक्षा व्यवस्थेत वाढ

अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात सुरक्षा व्यवस्थेत वाढ

अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात सुरक्षा व्यवस्थेत वाढ 

पिंपरी, ता. ४ - अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. शहरातील संवेदनशील भाग, धार्मिक स्थळे आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. विशेष गस्त घालण्याच्या सूचना पोलिस दलाला दिल्या आहेत. संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी (क्रमांक ११२) किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी केले आहे.

याबाबत अधिक माहिती पुणे पोलिस प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, शहरात सुमारे १२० ते १२५ इराणी नागरिक वास्तव्यास आहेत. पर्यटन, व्यवसाय, वैद्यकीय उपचार आणि शैक्षणिक व्हिसावर ते पुण्यात आले आहेत. काही इराणी महिलांनी भारतीय नागरिकांशी विवाह केला आहे. अशा सुमारे २५ ते ३० महिला शहरात वास्तव्यास आहेत. एकूण ६० इराणी विद्यार्थी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत.  

इराणी विद्यार्थी आणि नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून व्हिसा मुदतवाढ प्रक्रिया केली जाणार आहे.  याबाबत परराष्ट्र मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत.  शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories