news
clock
वडगाव मावळमध्ये रविवारी हिंदू संमेलनाचे आयोजन

वडगाव मावळमध्ये रविवारी हिंदू संमेलनाचे आयोजन

वडगाव मावळमध्ये रविवारी हिंदू संमेलनाचे आयोजन

पिंपरी, ता. २० -  हिंदू समाजाच्या ऐक्य, संघटन आणि संस्कृती संवर्धनाच्या उद्देशाने रविवारी (ता. २२) वडगाव येथे हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व वडगावसह पंचक्रोशीतील साते, ब्राम्हणवाडी, मोहितेवाडी, सांगवी, कातवी आणि सकल हिंदू समाजाच्या हे संमेलन होणार आहे. 

 वडगाव मावळ येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात हे संमेलन होईल. या संमेलनात सायंकाळी ५ ते ६ या वेळेत ग्रामप्रदक्षिणा, सायंकाळी ६ वाजता ध्वजारोहण व दीप प्रज्वलन, ६.३० वाजता गो माता पूजन, रात्री ७ ते ७.१५ वाजता मातृशक्ती या विषयावर मार्गदर्शन व ७.३० वाजता चैतन्य महाराज वाडेकर यांचे आशीर्वचन होईल.  

त्यानंतर शिवराज ग्रुपच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. समस्त हिंदू बंधू भगिनींनी या संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि वडगाव मावळ सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories