news
clock
'राजमाता जिजाऊ' बससेवेची पुण्यातून सुरवात, स्वारगेट ते बारामती मार्गावर सेवा सुरु

'राजमाता जिजाऊ' बससेवेची पुण्यातून सुरवात, स्वारगेट ते बारामती मार्गावर सेवा सुरु

'राजमाता जिजाऊ' बससेवेची पुण्यातून सुरवात, स्वारगेट ते बारामती मार्गावर सेवा सुरु

पुणे, ता. २७ - राज्य परिवहन महामंडळाच्या राजमाता जिजाऊ बससेवेचे उद्घाटन नुकतेच मुंबईमध्ये झाले. या सेवेचा प्रारंभ बुधवारी (ता. २५) पुण्यातून झाला. पुणे (स्वारगेट) ते बारामती मार्गावर ही सेवा सुरु झाली आहे. या सेवेसाठी २५० गाड्या पुणे विभागात दाखल होणार आहेत. अशी माहिती एसटीच्या पुणे विभागाने दिली आहे. 

राज्य परिवहन महामंडळाने सामान्य प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन विशेषतः महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही बस तयार केली आहे. यासाठी पुणे विभागाने एसटीच्या मुख्यालयाला २५० बसेसच्या मागणीचा प्रस्ताव पाठविला असून, येत्या काही महिन्यांत टप्याटप्याने या बस पुणे विभागात दाखल होणार आहेत. ही बस  विनावातानुकूलित असल्याने या बसचे तिकीट दर सामान्य प्रवाशांना परवडणारे आहेत. या बससेवेमुळे ग्रामीण भागातील प्रवासी सेवेचा दर्जा उंचावणार आहे. 

'राजमाता जिजाऊ' बससेवेला

'राजमाता जिजाऊ' बससेवेला बुधवारपासून (ता. २५) पुण्यातून प्रारंभ झाला. ही बस मंगळवारी रात्री उशिरा स्वारगेट स्थानकात दाखल झाली. पुणे-बारामती मार्गावर ही सेवा सुरु झाली. पुणे विभागाने २५० बसचा प्रस्ताव दिला असून, त्या बस टप्याटप्याने दाखल होतील.

- अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी विभाग, पुणे

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories