news
clock
अयोध्येतील श्रीराम मंदिर भारतीयांच्या मनातील राष्ट्रमंदिर आहे - जगदीश आफळे

अयोध्येतील श्रीराम मंदिर भारतीयांच्या मनातील राष्ट्रमंदिर आहे - जगदीश आफळे

अयोध्येतील श्रीराम मंदिर भारतीयांच्या मनातील राष्ट्रमंदिर आहे - जगदीश आफळे 

पुणे, ता. २६  "अयोध्येतील श्रीराम मंदिर हे श्रीरामलल्लाचे भव्य मंदिर आहे आणि ते भारतीयांच्या मनातील राष्ट्रमंदिर आहे," असे मत श्री राम मंदिराच्या बांधकाम प्रकल्पात मुख्य अभियंता असलेले जगदीश आफळे यांनी व्यक्त केले. येत्या वर्षभरात मंदिराचा संपूर्ण ७० एकरचा परिसर मूळ मंदिर आरेखनानुसार पूर्ण होऊन दर्शनासाठी खुला होईल, अशी माहिती आफळे यांनी दिली. 

'राममंदिर- कथा मंदिर उभारणीची' या पुण्यात झालेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. आफळे यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीतील विविध टप्प्यांतील अनुभव सांगितले. या वेळी मूर्तिशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, श्रीराम मंदिर भक्तिदान सेवा योजनेच्या माधुरी आफळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह प्रवीण दबडघाव, साकेत फाउंडेशनचे विश्वस्त विनीत कुबेर  उपस्थित होते.

आफळे यांनी २ नोव्हेंबर २०१९ मधील सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालापासूनची माहिती दिली व अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिर निर्मितीची प्रक्रिया सांगितली. ते म्हणाले, ''प्रभू श्रीरामांच्या मंदिरासाठी आजवर १३४ आंदोलने झाली, शेकडोंनी प्राणार्पण केले. हिंदूंसह जैन आणि शीख समाजाचाही मोठा सहभाग यात आहे. सन २०२० मध्ये मंदिराचे भूमिपूजन झाल्यावर पाया खोदताना या ठिकाणी मूळ मंदिरांचे अनेक अवशेष मिळाले.अनेक शिलालेख मिळाले. त्यावरन न्यायालयात पुन्हा नव्याने कालनिर्णयन झाले असून, इसवी सन पूर्व १३व्या शतकापर्यंतच्या इतिहासावर प्रकाश पडला आहे. '' 

साकेत फाउंडेशन आणि अमोल रावेतकर यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories