news
clock
राष्ट्रीय कौटुंबिक उत्पन्न सर्वेक्षणासाठी आकुर्डीमध्ये प्रादेशिक प्रशिक्षण परिषद

राष्ट्रीय कौटुंबिक उत्पन्न सर्वेक्षणासाठी आकुर्डीमध्ये प्रादेशिक प्रशिक्षण परिषद

राष्ट्रीय कौटुंबिक उत्पन्न सर्वेक्षणासाठी आकुर्डीमध्ये प्रादेशिक प्रशिक्षण परिषद 

पिंपरी, ता. २० -  राष्ट्रीय कौटुंबिक उत्पन्न सर्वेक्षणासाठी आकुर्डी येथील प्रादेशिक राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयात दोन दिवसीय प्रादेशिक प्रशिक्षण परिषदेला सोमवारी (ता. १६) प्रारंभ झाला. देशातील नागरिकांच्या कुटुंबांच्या उत्पन्नाची अचूक माहिती गोळा करण्यासाठी हे सर्वेक्षण केले जाणार आहे. 

प्रशिक्षणात उपसंचालक नरेश पाटील आणि सहायक संचालक वेदांत कोंडकर यांनी पर्यवेक्षक आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना सर्वेक्षणाची पद्धत, माहिती संकलनाची प्रक्रिया तसेच कामकाजाबाबत मार्गदर्शन

केले.  अध्यक्षस्थानी संयुक्त संचालक व प्रादेशिक प्रमुख डॉ. रुही कुलकर्णी होत्या. सहायक संचालक जी. एस. हिरेमठ हे प्रशिक्षणात सहभागी झाले. राष्ट्रीय कौटुंबिक उत्पन्न सर्वेक्षण एप्रिल २०२६ ते मार्च २०२७ या देशभर कालावधीत राबविण्यात येणार आहे. या सर्वेक्षणातून ग्रामीण आणि शहरी भागातील कुटुंबांच्या उत्पन्नाची माहिती गोळा केली जाणार आहे. वेतन, स्वयंरोजगार, शेती, व्यवसाय, निवृत्तीवेतन

तसेच इतर मार्गानी मिळणारे उत्पन्न याची नोंद या सर्वेक्षणातून केली जाणार आहे. याशिवाय कुटुंबातील सदस्यांची संख्या, शिक्षणाची पातळी, रोजगाराची स्थिती ही माहितीही संकलित केली जाणार आहे. 

या माहितीच्या आधारे समाजातील विविध घटकांच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास करणे शक्य होणार आहे. प्रशिक्षणादरम्यान संगणकाच्या सहाय्याने माहिती नोंदवण्याची पद्धतीबाबत प्रशिक्षण दिले.

दरम्यान, सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्य आवाहन केले आहे. नागरिकांकडून मिळालेली माहिती केवळ सांख्यिकीय कामासाठी वापरली जाईल आणि ती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असेही यावेळी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories