news
clock
गुंतवणुकीत चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून तब्बल ४ कोटी ९७ लाखांची फसवणूक

गुंतवणुकीत चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून तब्बल ४ कोटी ९७ लाखांची फसवणूक

गुंतवणुकीत चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून तब्बल ४ कोटी ९७ लाखांची फसवणूक 

पिंपरी, ता. २८ - आमच्या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून एका इसमाची तब्बल ४ कोटी ९७ लाख ४५ हजार २१७ रुपयांची फसवणूक झाली आहे. ही घटना हिंजवडीमध्ये जानेवारी २०२५ ते जानेवारी २०२५ या कालावधीत घडली आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा शुक्रवारी (ता. २७) दाखल केला आहे.  

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर फसवणूकीच्या घटनेमध्ये : सनी शहा रा. कलकत्ता (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही), राहुल जैन रा. इंदौर, मध्यप्रदेश (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही), अमीर खान व मयुर शेख (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) व दोन बॅंक खाते धारक असे आरोपी आहेत. 

आरोपींनी फिर्यादी इसमास त्यांच्या (आरोपींच्या) कंपनीमध्ये गुंतवणुक केल्यास गुंतवणुकीवर दरमहा ६ टक्के परतावा मिळवून देण्याचे अमिष दाखवले आणि एकूण ४ कोटी ९७ लाख ४५ हजार २१७ रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले व फिर्यादीची फसवणूक केली. 

आरोपींविरोधात बी.एन.एस २०२३ ३१६(२), ३१८ (४), ३ (५) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६ सी, ६६ डी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories