नगरसेवक झाल्याबद्दल कुणाल वाव्हळकर व धर्मपाल तंतरपाळे यांचा 'आरपीआय'तर्फे सन्मान
Feb 16 2026
47
नगरसेवक झाल्याबद्दल कुणाल वाव्हळकर व धर्मपाल तंतरपाळे यांचा 'आरपीआय'तर्फे सन्मान
युवक आघाडीची नवीन कार्यकारिणी जाहीर
पिंपरी, ता. १६ - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पिंपरी-चिंचवड शहर-जिल्ह्याच्या वतीने शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर आणि उपाध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांचा नगरसेवक झाल्याबद्दल भव्य सन्मान करण्यात आला. पक्षाचे युवक आघाडीचे शहराध्यक्ष डॉ. धम्मरत्न गायकवाड यांनी वाव्हळकर आणि तंतरपाळे यांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमात युवक आघाडीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली तसेच अनेक युवकांचा पक्षप्रवेशही करण्यात आला. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून संघटन मजबूत करण्याचे आणि युवकांनी समाजकार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास चंद्रकांता सोनकांबळे, अझीज शेख, विनोद चांदमारे, बाबा सर्वदे, दादा शिरोळे, राजू उबाळे साहेब, राजेंद्र कांबळे, विलास पाटील, इलाताई ठोसर, रुक्मिणी पाटील, मायरा मॅडम, बाळासाहेब गायकवाड, योगेश भोसले, किरण सामिंदर, संतोष डेंगळे, विकास गाडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज भास्कर यांनी केले. सोमंथजी उबाळे यांनी आभार मानले.
- नवीन पदाधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे -
भारत खरात – युवक कार्याध्यक्ष
सिद्धांत जगताप – युवक उपाध्यक्ष
राहुल नितनवरे – युवक सरचिटणीस
दिलीप मोरे – संपर्क प्रमुख
स्वप्नील कसबे – युवक चिंचवड विधानसभा प्रमुख
संतोष डेंगळे – युवक उपाध्यक्ष
निखिल केरणाले – संघटन सचिव
क्रांतिदीप जाधव – युवक उपाध्यक्ष