news
clock
पुणे महापालिकेच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे व उपमहापौरपदी परशुराम वाडेकर विराजमान

पुणे महापालिकेच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे व उपमहापौरपदी परशुराम वाडेकर विराजमान

पुणे महापालिकेच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे व उपमहापौरपदी परशुराम वाडेकर विराजमान

पिंपरी, ता. ९ - पुण्यात महापौर पदाची निवडणूक बिनविरोध झाली. भारतीय जनता पक्षाच्या मंजुषा नागपुरे यांची महापौरपदी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) परशुराम वाडेकर यांची उपमहापौरपदी विनबिरोध निवड झाली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली होती.

महापालिकेत सोमवारी सकाळी सव्वा अकरा वाजता महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. पीठासन अधिकारी जितेंद्र डुडी यांनी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली. काँग्रेसच्या अश्विनी लांडगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शितल सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

तत्पूर्वी भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, काँग्रेसचे नेते सुरेश कलमाडी, माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांच्या निधनामुळे महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती काँग्रेसचे गटनेते चंदुशेठ कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते नीलेश निकम यांना केली.

महापौर व उपमहापौर निवडीनंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, '' पुन्हा एकदा भाजपावर विश्वास दाखवून स्पष्ट बहुमत मिळवून दिले. त्यामुळे भाजप उमेदवारांची महापौर आणि उपमहापौर पदावर बिनविरोध निवड झाली.  पुणेकर जनतेचे धन्यवाद. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचे नुकतेच निधन झाले, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. पुणेकरांनी भाजपवर विश्वास दाखवला तो आम्ही सार्थ ठरवून दाखवू.''

--------------------------------------------------------------------------------------------

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories