news
clock
सांगोला पोलिसांनी केला पर्यावरण रक्षणाचा संकल्प, विविध झाडांची केली लागवड

सांगोला पोलिसांनी केला पर्यावरण रक्षणाचा संकल्प, विविध झाडांची केली लागवड

सांगोला पोलिसांनी केला पर्यावरण रक्षणाचा संकल्प, विविध झाडांची केली लागवड

पुणे, ता. २८ - जनतेचे रक्षण करण्यास कटिबद्ध असलेल्या पोलिसांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठीही पाऊल उचलले आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला पोलिस ठाण्यातील पोलिसांनी, पोलिस ठाण्याच्या परिसरात व आजूबाजूच्या मैदानी भागात वड, पिंपळ, पेरु, मोसंबी यासह विविध प्रकारच्या झाडांची लागवड केली.

पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमात सांगोला पोलिस स्थानकातील सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, पोलिस हेड कॉन्स्टेबल तसेच इतर अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. 

रोपांची नियमित देखभाल करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला. पोलिस निरीक्षक विनोद घुगे म्हणाले, ''वृक्षारोपण ही केवळ औपचारिकता नसून भविष्यातील पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याची जबाबदारी आहे.'' सांगोला पोलिसांचा हा उपक्रम सर्वांसाठी अनुकरणीय आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories