news
clock

हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने नागरीकांच्या चेहऱ्यावर खुलले हास्य 

सांगवी पोलिसांनी शोधले हरवलेले १३० मोबाईल  

पिंपरी, ता. ७ - सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हरवलेले १३० मोबाईल सांगवी पोलिसांनी   सी.ई.आय.आर. (CEIR - Central Equipment Identity Register) पोर्टलद्वारे शोधून काढले. शोधलेले हे मोबाईल शनिवारी (ता. ७) तक्रारदारांस व मूळ मालकांस सांगवी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या हस्ते परत केले.      

हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत देताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला आणि मोबाईलच्या मूळ मालकांनी आपापले मोबाईल मिळाल्याबद्दल पोलीसांचे आभार मानले. नागरीकांचा आमच्याप्रती असलेला हा विश्वास पाहून आम्हाला अशाच प्रकारे अधिक काम करण्याची प्रेरणा मिळाली, असे पोलिसांनी सांगितले. 

ही शोधमोहीम  पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, डॉ. शशिकांत महावरकर (पोलीस सह आयुक्त, पिंपरी चिंचवड), बसरवराज तेली (अपर पोलीस आयुक्त, प्रादेशिक विभाग, पिंपरी चिंचवड) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त संदीप आटोळ (परिमंडळ - १), सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे, सांगवी विभाग यांच्या नेतृत्वाखाली जितेंद्र कोळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक व अमोल नांदेकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) व राजकुमार माने पोलीस अंमलदार ब.न. ३३१४ यांनी पार पाडली. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories