news
clock
नवी सांगवीत गुंतवणुकीच्या आमिषाने ११ लाखांची फसवणूक

नवी सांगवीत गुंतवणुकीच्या आमिषाने ११ लाखांची फसवणूक

नवी सांगवीत गुंतवणुकीच्या आमिषाने ११ लाखांची फसवणूक

पिंपरी, ता. ५ - शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करुन दरमहा १० ते २० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तिघांची एकूण ११ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नवी सांगवी येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे.

याबाबत प्रतिक संजय तोडमल (वय २९, रा. गणेश पॅलेस, समर्थनगर, साई चौक, नवी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रविण विठ्ठल काटकर (वय ३३, रा. फ्लॅट नं. १६, गणेश पॅलेस, समर्थनगर, नवी सांगवी) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२) व ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ एप्रिल २०२३ ते ४ मार्च २०२६ या कालावधीत आरोपीने फिर्यादी व त्यांचे परिचित दीपक लोंढे आणि अक्षय सुतार यांना शेअर मार्केटशी संबंधित  कंपनीत गुंतवणूक केल्यास दरमहा १० ते २० टक्के नफा मिळेल तसेच एक वर्षानंतर मुद्दल परत मिळेल, असे आश्वासन दिले. यासाठी आरोपीने लेखी करारही करुन घेतला.

आरोपीच्या आश्वासनावर विश्वास ठेवून फिर्यादी प्रतिक तोडमल यांनी २ लाख ५० हजार रुपये, दीपक लोंढे यांनी ५ लाख रुपये तर अक्षय सुतार यांनी २ लाख रुपये अशी गुंतवणूक केली. त्यानंतर आरोपीने ठरल्याप्रमाणे नफा न देता व मुद्दल परत न करता एकूण सुमारे ११ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories