टाळ-मृदंगाच्या निनादात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपुराकडे प्रस्थान

टाळ-मृदंगाच्या निनादात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपुराकडे प्रस्थान

टाळ-मृदंगाच्या निनादात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपुराकडे प्रस्थान

पिंपरी, ता. 7 जुलै 2026 - टाळ-मृदंगाचा अखंड निनाद अन् ज्ञानोबा माऊली तुकाराम या नामघोषात संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आषाढी वारीसाठी मंगळवारी (ता. 7) देहूSant Tukaram Maharaj palkhi - dehuतून पंढरपुराकडे प्रस्थान झाले.‌ पावसा‌च्या अडथळ्याला मागे सारुन असंख्य वारकरी पालखी प्रस्थान सोहळ्यात प्रचंड उत्साहाने सहभागी झाले.

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा यंदाचा ३४१ वा पालखी सोहळा आहे. नियोजित वेळापत्रकानुसार   पहाटे पाच वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमांनी पालखी प्रस्थान सोहळ्यास प्रारंभ झाला. शिळा मंदिर, तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात विश्वस्तांच्या वतीने महापूजा झाली. इनामदार वाड्यात तुकोबांच्या पादुकांचे पूजन झाले. त्यानंतर सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत देहूकर महाराजांचे काल्याचे कीर्तन झाले.

दुपारी अडीचच्या सुमारास इनामदार वाड्यातून महाराजांच्या पादुका देऊळवाड्यातील भजनी मंडपात आल्या. त्यानंतर प्रस्थान सोहळ्याच्या कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी आलेल्या दिड्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंत्रघोषात पादुकापूजन करण्यात आले. चांदीच्या सिंहासनावर, चांदीच्या ताटात चांदीच्या पादुकांना अभिषेक करण्यात आला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, आमदार सुनील शेळके, महेश लांडगे यांच्या हस्ते पादुकांची पूजा करण्यात आली. दुपारी चार वाजून दोन मिनिटांनी पालखीने प्रस्थान ठेवले.

सायंकाळी पाचच्या सुमारास पालखी प्रदक्षिणा होऊन पालखी इनामदार वाड्याकडे मार्गस्थ झाली आज रात्री पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात असणार आहे. बुधवारी (ता. ८) सकाळी पालखी पिंपरी-चिंचवडकडे मार्गस्थ होईल.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories