सारसबाग आणि बागेतील गणपती मंदिर उद्या (ता. २८) व परवा (ता. २९) बंद राहणार
May 27 2026
21
सारसबाग आणि बागेतील गणपती मंदिर उद्या (ता. २८) व परवा (ता. २९) बंद राहणार
पुणे, ता. २७ - शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुण्यातील सारसबाग आणि सारसबागेतील गणपती मंदिर उद्या गुरुवारी (ता. २८) व परवा शुक्रवारी (ता. २९) बंद ठेवले जाणार आहे. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली आहे.
नागपुरे दिलेल्या माहितीनुसार, पोलिस उपायुक्त विशेष शाखा, पुणे शहर यांनी संपूर्ण पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्यानुसार शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून 28 मे व 29 मे रोजी सारसबाग उद्यान बंद ठेवण्यात येणार आहे
मात्र, पुण्यातील नागरीकांनी या नाराजी व्यक्त करत या निर्णयाला विरोध केला आहे. याबाबत, बोलताना महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या की, ''सारसबागेतील मंदिर २ दिवस बंद करण्याचा निर्णय हा पोलिसांनी घेतला आहे. मी फक्त महापौर म्हणून पुणेकरांना याबाबत माहिती दिली आहे. पोलिसांनी जी माहिती आम्हाला दिली, त्यानुसार मंदिर २८ आणि २९ तारखेला बंद ठेवण्यात येणार आहे. ''