महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि आसाममधून ३० महिला लोकप्रतिनिधी पुणे महानगरपालिका दौऱ्यावर
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि आसाममधून ३० महिला लोकप्रतिनिधी पुणे महानगरपालिका दौऱ्यावर
पिंपरी, ता. ८ ऑगस्ट २०२७ - प्रजा फाउंडेशनच्या अर्बन लीडशीप प्रोग्रॅम अंतर्गत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि आसाम या राज्यांतील १५ शहरांमधून ३० महिला लोकप्रतिनिधी पुणे महानगरपालिकेच्या दौऱ्यावर आल्या आहेत. महापौर मंजुषा नागपुरे यांनी या रणरागिणींचे स्वागत केले.
या भेटीदरम्यान या महिला लोकप्रतिनिधींना पुणे महानगरपालिकेच्या कार्यपद्धती, सभागृहाचे कामकाज, आपत्ती व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान विभाग, घनकचरा व्यवस्थापन तसेच शहर विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच महापौर कार्यालयात आयोजित संवादातून पुणे शहरातील लोकाभिमुख योजना, सुशासनाच्या प्रभावी पद्धती आणि विकासात्मक उपक्रमांविषयी प्रतिनिधींनी माहिती घेत अनुभवांची देवाणघेवाण केली.
या अभ्यासदौऱ्यामुळे विविध राज्यांतील महिला लोकप्रतिनिधींमध्ये परस्पर सहकार्य, ज्ञानविनिमय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिक प्रभावी, पारदर्शक व लोककेंद्रित प्रशासनासाठी नवी दिशा मिळाली, अशी माहिती पुणे महापालिकेकडून देण्यात आली आहे.
- महाराष्ट्र, Maharashtra, उत्तर प्रदेश, Uttar Pradesh, आसाम, Assam
- र्बन लीडरशिप प्रोग्रॅम, Urban Leadership Program
- पुणे महापालिका दौरा, Pune Municipal Corporation Visit
- महिला लोकप्रतिनिधी, Women Elected Representatives
- पुणे महानगरपालिका, Pune Municipal Corporation, PMC
- , महापौर मंजुषा नागपुरे, Mayor Manjusha Nagpure