इयत्ता चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
Feb 20 2026
46
इयत्ता चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
पिंपरी, ता. २० - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता चौथी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि इयत्ता सातवी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढविली आहे. आता २८ फेब्रुवारीपर्यंत पालकांना आपल्या पाल्यांचे परीक्षा अर्ज भरता येणार आहेत.
यंदा इयत्ता चौथी व सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिलला राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी होणार आहे. परीक्षा परिषदेने पूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांचे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याची मुदत ३० डिसेंबर २०२५ ते १३ फेब्रुवारी २०२६ अशी होती. काही शाळांकडून तांत्रिक अडचणी व अन्य कारणास्तव अर्ज प्रक्रियेत विलंब होत होता. त्यामुळे मुदतवाढीच्या मागणीची परीक्षा परिषदेने दखल घेतली. परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी २८ फेब्रुवारी ही दुसरी व अंतिम मुदतवाढ दिली आहे.
आता अंतिम मुदतीत कालावधीत सर्व शाळांनी विद्यार्थ्यांची नोंदणी आणि आवेदन प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन परीक्षा परिषदेने केले आहे. अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे, छायाचित्रे व माहिती अचूकपणे अपलोड करावी, अंतिम मुदतीनंतर कोणतीही अतिरिक्त मुदतवाढ दिली जाणार नाही, असे परीक्ष परीषदेने सांगितले आहे.