news
clock
कान्हेफाटा ते सावळेगावमधील रस्ता रुंदीकरण तत्काळ थांबवावे, रयत प्रहार संघटनेची मागणी

कान्हेफाटा ते सावळेगावमधील रस्ता रुंदीकरण तत्काळ थांबवावे, रयत प्रहार संघटनेची मागणी

 कान्हेफाटा ते सावळेगावमधील रस्ता रुंदीकरण तत्काळ थांबवावे, रयत प्रहार संघटनेची मागणी

पिंपरी, ता. २७ - मावळ तालुक्यात कान्हेफाटा ते सावळेगाव हद्दीत सुरु असलेले रस्ता रुंदीकरण बेकायदेशीर आहे. ते तत्काळ थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रयत प्रहार संघटनेने दिला आहे.

याबाबत संघटनेने वडगावच्या तहसीलदारांना निवेदन दिले आहे. सदर निवेदनात म्हटले आहे की, 

कान्हेफाटा ते सावळागाव हद्दीतील संबंधित रस्ता पूर्वी १५ फूट रुंदीचा होता. सध्या त्याचे रुंदीकरण केले जात आहे. मात्र, या कामासाठी शेतकऱ्यांच्या जमिनींची मोजणी करण्यात आलेली नाही. जमीन संपादनासंदर्भातील आवश्यक कायदेशीर प्रक्रिया, नोटीस देणे, हरकती न मागवता थेट काम सुरु करण्यात आले आहे. हे गंभीर आहे. हे रस्ता रुंदीकरणाचे काम ताबडतोब थांबवावे अन्यथा आंदोलन पुकारले जाईल.

निवेदनावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत मोरे, कृती समिती अध्यक्ष गुलाब शंकर तिकोणे, तालुका अध्यक्ष संतोष ढवळी व कार्याध्यक्ष सोनू खाडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories