news
clock
शिवजयंतीनिमित्त लांडेवाडी-भोसरीमध्ये महाआरोग्य व रक्तदान शिबिर

शिवजयंतीनिमित्त लांडेवाडी-भोसरीमध्ये महाआरोग्य व रक्तदान शिबिर

 शिवजयंतीनिमित्त लांडेवाडी-भोसरीमध्ये महाआरोग्य व रक्तदान शिबिर

पिंपरी, ता. १७ - शिवजयंतीनिमित्त भोसरी येथील नव महाराष्ट्र तरुण मंडळाच्या वतीने गुरुवारी (ता. १९) लांडेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य महाआरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९.३० ते सायं. ५ वाजेपर्यंत हे शिबिर सर्व नागरिकांसाठी खुले राहणार आहे. नागरीकांनी उत्स्फू्र्तपणे या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन संयोजक नगरसेवक विराज लांडे व माजी नगरसेवक विक्रांत लांडे यांनी केले आहे.

या शिबिरात मोफत डोळे तपासणी, सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, ऑर्थोपेडिक व जनरल शस्त्रक्रिया, महिलांच्या स्तनाची कर्करोग तपासणी, दंतरोग तपासणी, किमोथेरपी व रेडिएशन संदर्भातील मार्गदर्शन, कान-नाक-घसा तपासणी व शस्त्रक्रिया तसेच मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय ब्लड प्रेशर, ब्लड शुगर आणि ईसीजी तपासणीही मोफत केली जाणार असून आवश्यक शस्त्रक्रिया अत्यल्प दरात करून देण्यात येणार आहेत. या शिबिरामध्ये विशेष वैद्यकीय तज्ज्ञांकडून सल्ला व मार्गदर्शन देण्यात येणार आहे. 

या उपक्रमासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, रक्तदान शिबिराद्वारे गरजू रुग्णांना मदत करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories