news
clock
शिवजयंती उत्सवानिमित्त पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूकीत बदल

शिवजयंती उत्सवानिमित्त पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूकीत बदल

शिवजयंती उत्सवानिमित्त पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूकीत बदल 

पिंपरी, ता. १८ - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उदया, गुरुवारी (ता. १९) पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणूका निघणार आहेत व विविध कार्यक्रम होणार आहेत. हे सर्व कार्यक्रम सुरळीत पार पडावेत व परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पुणे शहर वाहतूक शाखेने केले आहे.

प्रामुख्याने पंडित नेहरू रस्ता, लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता आणि बाजीराव रस्त्यावरील वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येणार आहे. मिरवणूकीच्या मार्गावर काही काळासाठी वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे. आपत्कालीन सेवा, रुग्णवाहिका आणि आवश्यक सेवांच्या वाहनांना प्राधान्य देण्यात येणार आहे. नागरिकांनी मिरवणुकीच्या मार्गावर वाहने आणू नयेत, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.

असे आहेत वाहतूक मार्गांतील बदल व पर्यायी मार्ग......

१) जिजामाता चौकातून छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने खंडोजीबाबा चौक लोकमान्य टिळक रस्त्याने जावे.

२) गणेश रस्ता - दारूवाला पुलाकडून फडके हौद चौक, जिजामाता चौकाकडे येणारी वाहतूक दारूवाला पूल चौकातून वळविण्यात येतील.

३) केळकर रस्त्याने अप्पा बळवंत चौकातून जोगेश्वरी मंदिर चौकमार्गे बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येईल.

४) लक्ष्मी रस्त्यावर सोन्या मारुती चौकापर्यंत मिरवणूक असेपर्यंत वाहने संत कबीर चौकातून वळविण्यात येतील.

५) पूरम चौकातून बाजीराव रस्त्याने शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पूरम चौकातून टिळक रस्त्याने अलका टॉकीज आणि पुढे नामदार गोपाळकृष्ण गोखले (फर्ग्युसन रस्ता) रस्त्याने जावे.

६) मिरवणूक सुरू झाल्यानंतर अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे आणि बाजीराव रस्त्याने फुटका बुरूजकडे न जाता सर्व वाहनचालक केळकर रस्त्याने सरळ पुढे जातील.

७) मिरवणूक गाडगीळ पुतळा चौकाच्या पुढे जाईपर्यंत सर्व वाहने स्वातंत्र्यवीर सावरकर भवनजवळ पुलावरुन बालगंधर्व रंगमंदिराच्या दिशेने सोडण्यात येतील.

----------------------------------------------------------------------------------------

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories