news
clock
ऑनलाईन गुंतवणूकीत ३० लाख ७० हजारांना गंडा

ऑनलाईन गुंतवणूकीत ३० लाख ७० हजारांना गंडा

ऑनलाईन गुंतवणूकीत ३० लाख ७० हजारांना गंडा

पिंपरी, ता. २४ - स्टॉक मार्केटमध्ये जास्त परताव्याचे आमिष दाखवून ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून पिंगळे सौदागर येथील एका व्यक्तीची ३० लाख ७० हजार ६०६ रुपयांची फसवणूक झाली आहे. हा प्रकार जून २०२५ मध्ये घडला आहे. या प्रकरणी सोमवारी (ता. २३) सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ८ जून २०२५ ते २८ जून २०२५ या कालावधीत इंस्टाग्रामवर रिल्स पाहत असताना त्यांना एका व्हॉट्सअ‍ॅप गटात समाविष्ट करण्यात आले. या गटातील आरोपींनी एक अॅप डाउनलोड करण्यास सांगून त्यामध्ये गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा मिळेल, असे आमिष दाखविले.  आरोपींनी फिर्यादीस वेगवेगळ्या बँक खात्यांवर रक्कम जमा करण्यास सांगितले. सुरुवातीला नफ्याचे संदेश पाठवून विश्वास संपादन करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात कोणताही परतावा न देता आरोपींनी फिर्यादीची एकूण ३० लाख ७० हजार ६०६ रुपयांची  फसवणूक केली. 

आरोपींमध्ये व्हॉटसअप ग्रुपशी संबंधित व्यक्ती, करण भगत नामक इसम तसेच संबंधित बँक खातेदारांचा समावेश आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६ (२), ३ (५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (डी) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories