news
clock
प्रशासकीय काळातील सर्व कामांची श्वेतपत्रिका काढा, सर्वसाधारण सभेत नगरसेविका सुलभा उबाळे यांची मागणी

प्रशासकीय काळातील सर्व कामांची श्वेतपत्रिका काढा, सर्वसाधारण सभेत नगरसेविका सुलभा उबाळे यांची मागणी

प्रशासकीय काळातील सर्व कामांची श्वेतपत्रिका काढा, सर्वसाधारण सभेत नगरसेविका सुलभा उबाळे यांची मागणी 

पिंपरी, ता. २० - पिंपरी-चिंचवड महापालिकाच्या शुक्रवारी (ता. २०) झालेल्या  सर्वसाधारण सभेत  शिवसेनाच्या नगरसेविका सुलभा उबाळे यांनी प्रशासकीय काळात झालेल्या कामांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. प्रशासकीय काळातील सर्व कामांची श्वेतपत्रिका काढा, अशी जोरदार मागणी केली. 

नगरसेविका उबाळे म्हणाल्या, ''प्रशासकीय काळात अनेक कामे संशयास्पद पद्धतीने आणि घाईगडबडीत करण्यात आली आहेत.  सर्व कामांची सखोल चौकशी होऊन संपूर्ण माहिती सभागृहासमोर मांडावी.  तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांनी घेतलेल्या निर्णयांचीही चौकशी व्हावी. तसेच तत्कालीन आयुक्तांना किमान एकदा तरी ‘पाहुणे आयुक्त’ म्हणून सर्वसाधारण सभेत बोलावून त्यांनी केलेल्या कामांबाबत स्पष्टीकरण द्यावे.'' 

''आता अधिकाऱ्यांसमोर अर्थसंकल्पाबाबत काही मुद्दे मांडले की ‘पैसे नाहीत’ अशी भूमिका घेतली जाते. मग प्रशासकीय काळात निधी कसा उपलब्ध झाला ? '' असा प्रश्न उबाळे यांनी मांडला.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories