news
clock
'टी - २० प्रीमियर लीग' क्रिकेट स्पर्धेचे  माण - हिंजवडी येथे उद्घाटन

'टी - २० प्रीमियर लीग' क्रिकेट स्पर्धेचे माण - हिंजवडी येथे उद्घाटन

'टी - २० प्रीमियर लीग' क्रिकेट स्पर्धेचे  माण - हिंजवडी येथे उद्घाटन

पिंपरी, या. 8 - चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या दुसऱ्या पर्वातील ‘ टी – २० प्रीमियर लीग ‘ या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन  खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या हस्ते सोमवारी (ता.६)  झाले. 

पिंपरी-चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने माण – हिंजवडी येथील फोर स्टार क्रिकेट स्टेडियम   येथे ‘ टी – २० प्रीमियर लीग’ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन प्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश शेट्टी यांनी सन्मानचिन्ह देऊन खासदार बारणे यांचा सत्कार केला.

या स्पर्धेमध्ये टीम बन्ट्स वारियर – मालक रवी शेट्टी, प्रतीक रॉयल्स – नरेंद्र चुरी, स्पोर्ट स्टोरीज एवेन्जर्स – प्रेम कोकणे – सोनिगरा सुपर किंग्स – केतूल सोनिगरा, विश्व टायगर्स – विश्वजित बारणे, सह्याद्री किंग्स –  हर्षल मानकर, आसवानी डेअरडेव्हिल्स – श्री  आसवानी , मोरे पाटील पॅकेर्स – सुदाम मोरे हे संघ सहभागी झाले आहेत. 

यावेळी खासदार बारणे म्हणाले, ”टी – २० प्रीमियर लीग’ सारख्या क्रिकेट स्पर्धा शहरातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. स्पर्धा काही केवळ जिंकण्यासाठी नाही तर आपल्यातील कौशल्य दाखविण्यासाठी असते, खेळात सहभागी झालेले सर्वजण विजयी होणार नाहीत,  पण त्यामुळे खेळात रंगत येईल. पूर्वी या परिसरात काही फार वस्ती नव्हती. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या आल्यानंतर या परिसरात लक्षणीय बदल झाले. क्रिडा संस्कृतीलाही चालना मिळत आहे.” 

असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश शेट्टी म्हणाले, ”पिंपरी-चिंचवड प्रीमिअर लीग’ या क्रिकेट स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. आम्ही १९८२- ८३ ला क्रिकेट खेळायचो तेव्हा अशी सुंदर क्रीडांगण नव्हते. आता ती उपलब्ध आहे त्याचा फायदा खेळाडूंनी घ्यावा. मागील वर्षीपासून आपण ही आयपीएल स्पर्धा सुरु केली. खेळाडूंना उद्देशून ते म्हणाले, ”तुम्हाला चांगले मार्गदर्शक मिळाले आहेत, खेळण्यासाठी चांगले मैदान आहे. त्याचा उपयोग करा. चांगले खेळ आणि स्पर्धेच्या पंचांनी दिलेल्या निर्णयाचे पालन करा.” 

असोसिएशनचे सदस्य प्रदीप वाघ यांनी स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका मांडली. असोसिएशनचे सचिव राजू  कोतवाल यांनी प्रास्ताविक केले. या स्पर्धेमुळे खेळाडूंना त्यांच्यातील नैपुण्य सिद्ध करता येईल. यावेळी खासदार बारणे यांना संघटनेचे अध्यक्ष जगदीश शेट्टी यांनी खेळाडूंची ओळख करून दिली. स्पर्धेच्या करंडकाचे अनावरण  करण्यात आले.  यावेळी संघटनेचे खजिनदार संजय शिंदे, सहसचिव डॉ दिलीपसिंह मोहिते, सदस्य नरेंद्र कदम, मुकेश गुजराथी, प्रदिप वाघ, अरुण जागडे, आनंद नायडू, विजय कोतवाल, प्रशांत तेलंगे, सुशील जाधव  उपस्थित होते. 

 सागर कोळी यांनी सूत्रसंचालन केले. संघटनेचे सहसचिव दिलीपसिह मोहिते यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर राष्ट्रगीताने  कार्यक्रमाची सांगता झाली. 

निकाल -

यानंतर झालेल्या पहिल्या सामन्यात प्रतीक रॉयल्सने १६.५ षटकात सर्व बाद १०७ धावा केल्या. यामध्ये रुद्र पटेल – २०, साईश  शिंदे – २३, यशले कुचल – २४ , क्षितिज आगरवाल २२ / २, पियुष ढोले – १४/४ यांचा समावेश आहे.  शेट्टी बन्ट्स वॉरीयरने ११ षटकात बिनबाद १०८ धावा केल्या. त्यामध्ये हरीश बकले  – ३३, गणेश कलेल  – ६६ याचा समावेश आहे. गणेश कलेल यांना सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. बन्ट्स वॉरीयरने १० गडी राखून विजय मिळविला. उदघाटनाच्या  सामन्यात पहिला विजय बन्ट्स वॉरीयरने मिळविला.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories