तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने पवनामाईचे जलपूजन
पिंपरी, ता. १ ऑगस्ट २०२६ - पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना नदीचे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने शुक्रवारी (ता. ३१) विधिवत पूजन करण्यात आले.
पवना माईची ओटी भरून शहराच्या सुख-समृद्धीसाठी, नागरिकांना अखंड व मुबलक पाणीपुरवठा व्हावा तसेच सर्वांच्या आरोग्यदायी, आनंदी आणि समृद्ध जीवनासाठी प्रार्थना करण्यात आली. नगराध्यक्ष संतोष दाभाडे-पाटील यांनी नदीचे विधिवत पूजन करून नदी संवर्धन व स्वच्छतेचा संदेश दिला.
यावेळी नगराध्यक्ष संतोष दाभाडे-पाटील, सार्वजनिक आरोग्य समितीचे सभापती निखिल भगत, गटनेत्या हेमलता खळदे, नगरसेविका शोभा परदेशी, सुरेखा भेगडे, भारती धोत्रे, संगीता खळदे, अनिता पवार, आशा भेगडे आणि नगरसेवक उपस्थित होते.
पवनामाईचा आशीर्वाद सदैव तळेगाव दाभाडे शहरावर राहो, शहरातील प्रत्येक नागरिकाच्या घरापर्यंत अखंड जलसेवा पोहोचो, अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळी तळेगाव दाभाडेचे नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या.