ताथवडेत आयव्ही लीग हॉस्टेलसमोर हॉटेल व्यावसायिकावर हल्ला
पिंपरी, ता. ६ - 'वॉचमनला शिवीगाळ का करता' असे विचारल्याच्या कारणावरुन ताथवडे परिसरातील एका हॉटेल व्यावसायिकास व त्या हॉटेलमधील कॅशिअरला दोन तरुणांनी मारहाण केली. ही घटना बुधवारी (ता. ४) घडली आहे. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींना नोटीस देऊन मुक्त केले आहे.
विराज दत्तात्रय खुटवड (वय २८ वर्षे, हॉटेल व्यवसाय, रा. पिंपळे सौदागर) यांनी फिर्याद दिली आहे. या मारहाणीच्या घटनेत १) उत्कर्ष शुक्ला (वय अंदाजे २२ वर्षे रा थेरगांव) व राघव योगेंद्र श्रीवास्तव (वय २० वर्ष ताथवडे) हे आरोपी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विराजे आरोपींना 'वॉचमनला शिवीगाळ का करता' असे विचारले. त्यावरुन दोन्ही आरोपींनी फिर्यादीस व त्यांच्या हॉटेलचा कॅशिअर नामे आनंद बालाजी घोरबांड (वय २२ वर्षे) यास लाथाबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. उत्कर्ष शुक्ला याने त्याचे हातातील पांढ-या रंगाचे धातूचे कडे काढून फिर्यादीचे डोक्यात मारुन त्याला जखमी केले.
आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१),११५ (२),३५२.३/५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना नोटीस देऊन मुक्त केले आहे.