news
clock
''थेरगावमध्ये पवना नदीपात्रात टाकला जातोय भराव, तातडीने कारवाई करा''

''थेरगावमध्ये पवना नदीपात्रात टाकला जातोय भराव, तातडीने कारवाई करा''

''थेरगावमध्ये पवना नदीपात्रात टाकला जातोय भराव, तातडीने कारवाई करा''

माजी नगरसेवक मारुती भापकर यांची महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार

पिंपरी, ता. ८ - चिंचवड परिसरातील आदित्य बिर्ला रुग्णालयाजवळ पवना नदीच्या पात्रात  खेळाचे मैदान विकसित करण्याच्या नावाखाली भराव टाकणे, झाडांची तोड करणे तसेच लहान झाडांना मातीखाली गाडण्याचे प्रकार सुरु असल्याचे माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे. या प्रकारावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी भापकर यांनी केली आहे.

 याबाबत भापकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी तसेच पर्यावरण विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, थेरगावात पवना नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर माती टाकून नदीपात्र अरुंद केले जात आहे. त्यामुळे पवना नदीचा नैसर्गिक प्रवाह आणि अस्तित्व धोक्यात येण्याची भीती आहे. 

 नदीकाठावरील झाडांची तोड करुन काही झाडांचे बुंधे मातीखाली गाडण्यात येत असल्याचे भापकर यांनी सांगितले आहे. 

या गंभीर प्रकरणाकडे महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून  दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत भापकर यांनी केला आहे. तातडीने संबंधित जागेची प्रत्यक्ष पाहणी करुन सुरु असलेली अवैध कामे थांबवावीत. सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories